गुंतवणुकीची संधी: ‘सीपीएसई ईटीएफ एफएफओ-5' खुला होतोय 

गुंतवणुकीची संधी: ‘सीपीएसई ईटीएफ एफएफओ-5' खुला होतोय 

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या र्निगुतवणूक कार्यक्रमाचा एक घटक बनलेल्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांवर (सीपीएसई) आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)च्या पाचव्या टप्प्याची घोषणा झाली आहे.  ‘सेन्ट्रल पब्लिक सेक्टर एन्टरप्राईजेस ईटीएफ’ अर्थात ‘सीपीएसई ईटीएफ एफएफओ -5’ गुंतवणुकीसाठी येत्या 19 जुलैपासून खुला होत आहे. 

ही योजना 19 जुलैपासूनपासून गुंतवणुकीस खुली होत आहे. सरकारने आठ हजार कोटींचे निर्गुतवणूक लक्ष्य निर्धारित केले असून अधिक मागणी आल्यास निर्गुतवणूक मूल्य आठ हजार कोटींवरून 11 हजार 500 कोटींपर्यंत वाढविता येईल.

 सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न आणि महारत्न श्रेणीच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये या फंडातून विहित मात्रेत 100 टक्के गुंतवणूक करण्यात येईल. यात ओएनजीसी, कोल इंडिया, इंडियन ऑइल, ऑइल इंडिया, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एनटीपीसी, एनबीसीसी आणि एनएलसी इंडिया अशा नऊ कंपन्यांच्या समभागांचा समावेश आहे.

मार्च 2014 मध्ये निर्गुतवणुकीचा एक मार्ग म्हणून ‘सीपीएसई ईटीएफ’ फंडाच्या पर्यायाबाबत संकल्पना पुढे आली. त्या वेळी गोल्डमन सॅक्स म्युच्युअल फंडाद्वारे प्रस्तुत पहिल्या योजनेतून गुंतवणूकदारांकडून 3000 कोटी रुपये उभारण्यात आले. ऑक्टोबर 2015 मध्ये या धर्तीच्या नव्या फंडाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी रिलायन्स म्युच्युअल फंडाकडे सुपूर्द करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com