esakal | GDP आणखी किती घसरणार; सरकारने जाहीर केला अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal (14).jpg

कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे.

GDP आणखी किती घसरणार; सरकारने जाहीर केला अंदाज

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. मात्र टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे चाक हळूहळू रुळावर येत आहे. चालू आर्थिक वर्षातील (2020-21) पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्च-मे महिन्याच्या कालावधीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) 23.9 टक्क्यांची मोठी घसरण झाल्याचे समोर आले होते. तर त्यानंतरच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जून-ऑगस्ट महिन्यात जीडीपी मध्ये 7.5 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. 

आता बँकेत जाण्याची गरज नाही, Paytm वर मिळेल 2 मिनिटांत 2 लाखांचे कर्ज

यानंतर आता 2020-21 या आर्थिक वर्षाचा अंदाज सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. आणि या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये देशांतर्गत उत्पादनात 7.7 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. तर मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आर्थिक वाढीचा दर 4.2 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्य 2011-12 प्रमाणे 2020-21 च्या आर्थिक वर्षात 134.40 लाख कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे. मागील 2019-20 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 145.66 लाख करोड होते. 

Advance Estimates of #GDP of 2020-21 released by National Statistics Office

Movement of various high frequency indicators in recent months, points towards broad based nature of resurgence of economic activity

Read here: https://t.co/fXHpUnWt73

— PIB India (@PIB_India) January 7, 2021

दरम्यान, कालच वर्ल्ड बँकेने जाहीर केलेल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण यंदाच्या आर्थिक वर्षात 9.6 टक्क्यांनी घसरणार असल्याचे म्हटले होते. याशिवाय वर्ल्ड बँकेने आपल्या या अहवालात कोरोनाची साथ येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था आक्रसली असल्याचे नमूद केले होते. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था 10.3 टक्क्यांनी उतरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारात 7.5 टक्क्यांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता.       

loading image