esakal | आता बँकेत जाण्याची गरज नाही, Paytm वर मिळेल 2 मिनिटांत 2 लाखांचे कर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

indian currency 1.png

कंपनीच्या या पावलामुळे छोटी शहरे आणि गल्लीतील असे व्यापारी ज्यांच्यापर्यंत बँका किंवा वित्तीय संस्था पोहोचल्या नाहीत तेही आर्थिकदृष्ट्या सशक्त होतील.

आता बँकेत जाण्याची गरज नाही, Paytm वर मिळेल 2 मिनिटांत 2 लाखांचे कर्ज

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्लॅटफॉर्म पेटीएमने इन्स्टंट पर्सनल लोन देण्यास सुरुवात केली आहे. पेटीएमची ही सेवा 24x7 उपलब्ध असेल म्हणजे वर्षाचे 365 दिवस कर्ज घेता येईल. या सेवेच्या माध्यमातून 2 मिनिटांत कर्ज मिळेल. पेटीएमच्या या सेवेच्या माध्यमातून 2 लाखांपर्यंतचे कर्ज त्वरीत मिळू शकते. पगारधारक, छोटे व्यापारी किंवा व्यावसायिकांना हे कर्ज सहज मिळू शकेल. कंपनीच्या या पावलामुळे छोटी शहरे आणि गल्लीतील असे व्यापारी ज्यांच्यापर्यंत बँका किंवा वित्तीय संस्था पोहोचल्या नाहीत तेही आर्थिकदृष्ट्या सशक्त होतील. Paytm च्या माध्यमातून तुम्ही कसे कर्ज घेऊ शकता हे जाणून घेऊयात..

* पेटीएमचे हे कर्ज क्रेडिट स्कोअर आणि शॉपिंगच्या पॅटर्नवर आधारित असेल. 

हेही वाचा- RBI द्वारे सहा नव्या पेमेंट वॉलेटची सुविधा; विना इंटरनेट आवाजाद्वारे करु शकाल व्यवहार

* ग्राहक कर्जाची रक्कम 18 ते 36 महिन्यांच्या ईएमआयमध्ये परतफेड करु शकतो. हे कर्ज NBFC आणि बँकांच्या माध्यमातून दिले जाईल. 
 
* जे लोक त्वरीत कमी कालावधीचे कर्ज घेऊ इच्छितात, त्यांची गरज भागणार

हेही वाचा- मुकेश अंबानी यांना दुसरा धक्का; श्रीमंतीला लागले ग्रहण

* इच्छुक ग्राहक Paytm ऍपच्या फायनान्शियल सर्व्हिस सेक्शनमध्ये जाऊन पर्सनल लोन टॅबवर क्लिक करुन पुढची प्रक्रिया पूर्ण करु शकतो. बीटा फेजच्या दरम्यान कंपनीने 400 निवडक ग्राहकांना कर्ज दिले आहे. 
 

loading image
go to top