सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा 'ईटीएफ' येणार

वृत्तसंस्था
Wednesday, 20 February 2019

नवी दिल्ली: केंद्र सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणण्याचा विचार करत आहे. येत्या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या इक्विटी भांडवलासंबंधी ईटीएफ खुला करण्याची सरकारची योजना आहे. सध्या काही बँकांच्या शेअरचे भाव खाली आहेत. ते कदाचित गुंतवणूकदारांना आकर्षित करणार नाहीत. मात्र विविध बँकांचे शेअर एकत्र करून बाजारात ईटीएफ आणल्यास गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 

सरकारने 'भारत 22 आणि सीपीएसई हे दोन ईटीएफ दाखल केले असून त्यांना गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन ईटीएफमधून सरकारने अनुक्रमे 32,900 कोटी व 28,500 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. गेल्या आठवडय़ात विक्री झालेल्या ‘भारत 22 ईटीएफ’ योजनेतून त्यात 10 हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. ‘भारत 22’ एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) गुंतवणुकीसाठी अतिरिक्त प्रस्तावरूपात 14 फेब्रुवारीला खुला झाला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government may launch exchange traded fund of PSU bank stocks