esakal | पाडव्याच्या सोने खरेदीला स्वस्ताईचा मुलामा 
sakal

बोलून बातमी शोधा

पाडव्याच्या सोने खरेदीला स्वस्ताईचा मुलामा 

पाडव्याच्या सोने खरेदीला स्वस्ताईचा मुलामा 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई: चलन बाजारात रुपयाचे डॉलरसमोर मूल्य वधारल्याने सोने आयातीचा खर्च कमी झाला आहे. परिणामी आठवडाभरात सोने दर प्रती दहा ग्रॅमला एक हजारांनी कमी झाला आहे. सोन्यावरील सोने स्वस्ताईचा मुलाम्याने गुढी पाडव्याच्या मुहुर्ताला ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सराफा बाजार सजला आहे.शुक्रवारी (ता.5) मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला 13 रुपयांवर वधारून 31 हजार 609 रुपयांवर बंद झाला. चांदीच्या दरात प्रती किलोला 340 रुपयांची घसघशीत वाढ झाली. चांदीचा भाव एक किलोला 37 हजार 560 रुपये आहे. 
महिनाभरापूर्वी सोने 32 हजारांवर गेल्याने लग्नसराईतील मागणीवर परिणाम झाला होता. मात्र अमेरिका-चीन व्यापारी संघर्ष, ब्रेग्झिट या घडामोडींनी जागतिक बाजारात सोने दरांवर परिणाम झाला आहे. चलन बाजारात डॉलरसमोर रुपया मजबूत झाल्याने आयातदारांना दिलासा मिळाला असून गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव सातत्याने घसरत आहे. दोन आठवड्यांपूर्वी सोने दर 32 हजार 500 रुपयांवर होता, मात्र आठवडाभरात सोने जवळपास एक हजार रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहक खरेदीकडे वळाला असल्याचे पांडुरंग हरी वैद्य सराफा पेढीचे दिलीप वैद्य यांनी सांगितले. ते म्हणाले की, लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवर दागिन्यांना मागणी आहे. सोने काही प्रमाणात स्वस्त झाल्याने बाजारात सकारात्मक वातावरण असून यंदा विक्रीत 20 टक्के वाढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पाडव्याला बाजारात 22 कॅरेटचा दर प्रती दहा ग्रॅम 30 हजार 950 रुपये आणि 23 कॅरेटचा दर 31 हजार 500 रुपयांच्या आसपास राहील, असे अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

सोन्यातील गुंतवणुकीबद्दल सांगत आहेत पी एन गाडगीळ अँड सन्सचे सीईओ अमित मोडक..


गुंतवणुकीच्यादृष्टीने सोने खरेदी 
भांडवली बाजारातील अनिश्‍चिततेने गुंतवणूकदार हवालदिल झाला आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात रोज चढ-उतार होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला पसंती दिली आहे. गुंतवणूकदारांकडून शुद्ध सोन्याची नाणी, बिस्कीटे यांना मागणी आहे. यामुळे यंदा एकूण सोने विक्री गतवर्षाच्या तुलनेत जास्त होण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

loading image