esakal | ग्रॅज्युईटीचा पाच वर्षांचा कालावधी, कमी होण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

grejyuti period may reduce from 5 years

गेल्या आठवड्यात समितीने सामाजिक सुरक्षे संदर्भात एक अंतिम अहवाल सादर केलीय. त्यात श्रमिकांच्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित नऊ मुद्द्यांचा समावेश आहे.

ग्रॅज्युईटीचा पाच वर्षांचा कालावधी, कमी होण्याची शक्यता

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी (Grejyuti)मिळण्याचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संसदेत विचार सुरू असून, त्यासाठीचा प्रस्तावही देण्यात आला आहे. सध्या देशात ग्रॅज्युईटीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कंपनी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नुकसान टळणार आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नऊ मुद्द्यांचा अहवाल
सध्याच्या देशातील परिस्थितीचा विचार केला तर, एक कर्मचारी दीर्घ काळासाठी कोणत्याही कंपनीत काम करत, नसल्याचे वास्तव संसदीय समितीच्या पुढे आले आहे. श्रम मंत्रालयाच्या विशेष समितीने या संदर्भात एक रिपोर्ट सादर केला असून, त्यात ग्रॅज्युईटीचा कालावधी पाच वर्षांवरून एक वर्षे करण्याची शिफारस केलीय. गेल्या आठवड्यात समितीने सामाजिक सुरक्षे संदर्भात एक अंतिम अहवाल सादर केलीय. त्यात श्रमिकांच्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित नऊ मुद्द्यांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे समितीचा अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव संसदेत मंजूर होण्याची शक्यता आहे. 2018मध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांवरून तीन वर्षे करण्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, त्याला मंजुरी मिळाली नाही. यावेळी मात्र, हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे परिस्थिती?
सध्या देशात कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. पण, अनेकजण एका कंपनीत इतका कालावधी नोकरी करत नाहीत. कंपनी बदलताना त्यांना ग्रॅज्युईटीच्या पैशांवर पाणी सोडावं लागत आहे. ग्रॅज्युईटीचा लाभ अनेक कर्मचाऱ्यांना मिळतच नाही. त्यामुळे हा कालावधी कमी करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे.