"जीएसटी' संकलन 11.77 लाख कोटींवर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मागील आर्थिक वर्षातील स्थिती; मार्चमध्ये उच्चांक 
नवी दिल्ली: सरलेल्या आर्थिक वर्षात (2018-19) वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) एकूण 11.77 लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त झाला आहे. तिथेच मार्च महिन्यातील जीएसटीद्वारे 1 लाख 6 हजार कोटी रुपये मिळाले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने सोमवारी दिली. 

सरकारने गेल्या आर्थिक वर्षासाठी जीएसटी संकलनाचे उद्दिष्ट 11.47 लाख कोटी ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. मार्च महिन्यातील संकलन हे गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत 15.6 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. मार्च 2018 मध्ये जीएसटीद्वारे 92,167 कोटींचा महसूल जमा झाला होता. जीएसटी लागू झाल्यापासून मासिक विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. मार्चमध्ये एकूण 75.95 लाख जणांनी जीएसटी विवरणपत्रे भरल्याचे मंत्रालयाने सांगितले. 
दरम्यान, जीएसटीद्वारे मिळणारा महसूल 2018-19 मध्ये सरासरी 98,114 कोटी राहिला. त्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 9.2 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. घरे, विविध वस्तू व उत्पादनांवरील जीएसटी दरात केलेल्या मोठ्या कपातीनंतरही संकलनात वाढ झाल्याचे अर्थ मंत्रालयाने नमूद केले. चालू आर्थिक वर्षासाठी (2019-20) सरकारने जीएसटी संकलनाचे उद्दिष्ट 13.71 लाख कोटी रुपये निर्धारित केले आहे. 

मार्चमधील संकलन 
- सीजीएसटी ः 20,353 
- एसजीएसटी ः 27,520 
- आयजीएसटी ः 50,418 
- सेस ः 8,286 
(आकडे हजार कोटींत) 

मार्च महिन्यातील जीएसटी संकलनाने 1 लाख 6 हजार 577 कोटी रुपये या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला असून, हा आकडा उत्पादन व विक्री या दोन्हींमध्ये वाढ दर्शवतो. 
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST collections at ₹1.06 lakh cr. in March