
मार्चमध्ये केंद्राची छप्परफाड कमाई, GST तून 1.42 लाख कोटींची वसुली
नवी दिल्ली : देशात जीएसटी कायदा (GST Act) लागू झाल्यानंतर, मार्च 2022 मध्ये आतापर्यंतचे विक्रमी जीएसटी संकलन झाले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2022 मध्ये, जीएसटी संकलन 1.42 लाख कोटी रुपये म्हणजेच 1,42,095 कोटी रुपये झाले आहे. एका महिन्यातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक GST कर संकलन आहे. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) काही वेळापूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. (GST Collection News )
मार्च 2022 मध्ये एकूण GST संकलन महसूल 1,42,905 कोटी रुपये होता ज्यामध्ये CGST चा वाटा 25,830 कोटी रुपये आणि SGST 32,378 कोटी रुपयांचा आहे. आयजीएसटीचे संकलन रु.39,131 कोटी आहे आणि सेसचे योगदान रु.9417 कोटी इतके आहे. यामध्ये मालाच्या आयातीवर 981 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ग्रॉस GST कलेक्शन आतापर्यंतच्या उच्चांकावर असून, जानेवारीमध्ये 1,40,986 कोटी रुपयांच्या उच्च संकलनाचा आकडा यामुळे मागे पडला आहे.
ई-वे बिलातही वाढ
मार्च 2022 मध्ये, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 25 टक्क्यांनी वाढला होता आणि सेवांच्या आयातीसह देशांतर्गत व्यवहारांच्या महसुलात गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढ झाली होती. एकूण ई-वे बिलाबद्दल बोलायचे झाले तर, जानेवारी 2022 मध्ये ते 6.88 कोटी होते आणि फेब्रुवारी 2022 मध्ये हा आकडा 6.91 कोटींवर आला आहे.
Web Title: Gst Collections Hit All Time High In March Month Reached At 142 Lakh Crore Rupees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..