नागरिकांना दिलासा; बिगर हॉलमार्क दागिने विकता येणार!

gold rate
gold rategold rate

मुंबई - सोन्याचे दागिने हॉलमार्क प्रमाणित असणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे नागरिकांना सोन्याचे दागिने विकताना घट येणार नाही व त्यांना आपल्या सोन्याचे संपूर्ण मूल्य मिळेल. दुसरीकडे घरातील जुन्या सोन्याच्या बिगर हॉलमार्क दागिन्यांबाबत सध्यातरी कोणत्याही अडचणी येणार नसल्याचे चित्र आहे. नागरिकांना ते दागिने व्यावसायिकांकडे जाऊन विकता येतील. असे दागिने हॉलमार्क प्रमाणित करण्याचे बंधन मात्र सुवर्णकारांवर असेल. त्यामुळे जुन्या दागिन्यांवरून काळजीत पडलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हॉलमार्क दागिन्यांसंदर्भातील निर्णय केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला. त्याची अंमलबजावणी १५ जूनपासून सुरू झाली. अर्थात यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिकांना वेळ मिळावा म्हणून असे व्यवहार न करणाऱ्यांना ऑगस्टअखेरपर्यंत कसलाही दंड होणार नाही, असेही सध्या ठरविले आहे. भारतीय मानक संस्था (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड -बीएसआय)चे महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी नुकतीच ही घोषणा केली. नागरिक आपल्या घरातील सोन्याचे जुने दागिने सुवर्णकारांना विकू शकतात. नंतर त्याचे रूपांतर हॉलमार्क दागिन्यांमध्ये करणे (आहे त्याच स्थितीत किंवा नवा दागिना घडवून) ही सुवर्णकारांची जबाबदारी राहील.

gold rate
युती पुन्हा होणार? फडणवीसांचं शिवसेनेबाबत सूचक वक्तव्य, म्हणाले…!

सध्या देशात फक्त ३० टक्के दागिने हॉलमार्क असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार तसेच अन्न व नागरी सुरक्षामंत्री पीयूष गोयल यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’नुसार भारतात चार लाख दागिने व्यावसायिक आहेत. त्यातील ३५ हजार ८७९ व्यावसायिक ‘बीआयएस’ प्रमाणित आहेत. गेल्या पाच वर्षांत देशातील हॉलमार्क मानांकन केंद्रांच्या संख्येत २५ टक्के वाढ झाली. ही संख्या ४५४ पासून ९४५ एवढी वाढली.

gold rate
'म्युकर'नंतर बोन डेथचं संकट; हाडे होतात कमकुवत

देशभरात हॉलमार्कची स्थिती

- हॉलमार्क केंद्रे १५०० दागिन्यांवर प्रमाणिकरणाचे शिक्के मारू शकतात

- सर्व केंद्रे मिळून वर्षभरात १४ कोटी दागिने हॉलमार्क प्रमाणित करू शकतात. (३०० कामाचे दिवस धरल्यास)

- सुरुवातीला देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क अनिवार्य

- या जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सुविधा देणारे एकतरी केंद्र आहे

- अंदमान-निकोबार बेटांवर शंभर सुवर्णकार आहेत; मात्र हॉलमार्कसाठी कोलकता, चेन्नईला जावे लागते

- संपूर्ण मध्य प्रदेशात फक्त ३८ हॉलमार्क केंद्रे

gold rate
युती पुन्हा होणार? फडणवीसांचं शिवसेनेबाबत सूचक वक्तव्य, म्हणाले…!

असे हॉलमार्किंग

जुन्या सोन्याच्या दागिन्यांत जोडकाम करताना सोने, चांदी व तांबे यांचे मिश्रण वापरले जात असे; मात्र त्याने सोन्याचा कस कमी होत असे व २३ कॅरेटचा दागिना २२ कॅरेटचा होत असे. १९९० ते २००५ मध्ये हे जोडकाम केडीएम धातूने होऊ लागले. जोडकाम झाल्यावर केडीएमचा बहुतांश भाग उडून जात असे; मात्र त्याचा काही अंश दागिन्यांत राहत असल्याने लोकांना कर्करोगाची भीती वाटू लागली. त्यामुळे हॉलमार्क पद्धती आली. यात झिंक धातूने दागिना जोडला जातो. नंतर ते झिंक उडून जाते. त्याचा अंशही तेथे राहत नाही. त्यामुळे तो दागिना मोडल्यावरही सोने तेवढेच राहते.

gold rate
सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच- सरसंघचालक

दागिन्यांसाठी आता युनिक आयडी

आधार क्रमांकाप्रमाणे लवकरच प्रत्येक दागिन्यासाठी सहा आकडी हॉलमार्क युनिक आयडी कोड येणार आहे. त्यामुळे त्या दागिन्यांवर सरकारला लक्ष ठेवता येईल. भारतातील सोन्याची आयात, निर्माण होणारे दागिने व त्यापोटी सरकारला मिळणारा कर महसूल यांचा मेळ बसत नसल्याने हा काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती प्रमोदकुमार तिवारी यांनी दिली.

हॉलमार्क केंद्रांची सुविधा असलेले जिल्हे

अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, नगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com