जिओची माघार; दूरसंचार कंपन्यांचे शेअर्स सावरले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई: रिलायन्स जिओने 'समर सरप्राइज ऑफर' मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. एअरटेल आणि आयडियाच्या शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिलेल्या सल्ल्यानंतर रिलायन्सने जिओची समर सरप्राइज ऑफर मागे घेतली आहे. जिओची मोफत डेटा आणि कॉलची वेलकम्‌ ऑफर 31 मार्च 2017ला बंद झाली. त्यानंतर 1 एप्रिलपासून डेटा व कॉलवर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय जिओने घेतला. यासाठी प्राइम मेंबरशीपचे आवाहन जिओकडून करण्यात आले होते. याअंतर्गत 303 रुपयांच्या प्लानसह इतर प्लानचाही समावेश होता.

सध्या(12 वाजून 30 मिनिटे) एअरटेलचा शेअर 346.90 रुपयांवर व्यवहार करत असून 1.49 टक्क्याने वधारला आहे. दरम्यान, आयडियाचा शेअर 1.15 टक्क्याने वधारुन 87.60 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, आरकॉमचा शेअर 40.20 रुपयांवर सपाट व्यवहार करत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Has Jio Summer Surprise offer ended after TRAI order? Yes and no because it's complicated