‘एचसीएल’ करणार १५हजार जणांची भरती

वृत्तसंस्था
Wednesday, 22 July 2020

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सहा हजार अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.कंपनीने १७जून रोजी तिमाहीचा निकाल जाहीर केला होता.कंपनीचा नफा३१.७०टक्क्यांनी वाढून तो २हजार ९२५कोटी रुपये झाला होता.

नवी दिल्ली -  सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाच्या संकटकाळातही एचसीएल टेक्नॉलॉजीने १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी कंपनीने नऊ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍपd

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सहा हजार अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कंपनीने १७ जून रोजी तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. कंपनीचा नफा ३१.७० टक्क्यांनी वाढून तो २ हजार ९२५ कोटी रुपये झाला होता. कंपनीला गेल्या वर्षी याच तिमाहीत २ हजार २२० कोटी रुपयांचा नफा झाला होता. एचसीएल टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षपदी संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या रोशनी नाडर-मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या रोशनी या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HCL Technology decided to recruit 15,000 employees