esakal | ग्राहकांना दिलासा; आता या बँकेने केली कर्जदरात कपात 
sakal

बोलून बातमी शोधा

HDFC Bank cuts MCLR by up to 15 bps

ग्राहकांना दिलासा; आता या बँकेने केली कर्जदरात कपात 

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई: स्टेट बँकेनंतर आता खाजगी क्षेत्रातील बँक असलेली एचडीएफसी बँकेने "मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड'वर आधारित (एमसीएलआर) कर्ज दरात 0.15 टक्‍क्‍याने कपात केली आहे. सोमवारपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. आता "एसबीआय'च्या "एमसीएलआर'वर आधारित गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होणार आहेत. बँकेने सर्वच कालावधीसाठी एमसीएलआरचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन दर 7डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. 

नोव्हेंबर महिन्यात एचडीएफसी बँकेने सर्वच कालावधीसाठी एमसीएलआरच्या दरात 0.10 टक्क्यांची कपात केली होती. आता पुन्हा कपात करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. आता गृहकर्ज, दुचाकी आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याज दरांमध्ये कपात करण्यात येणार आहे. स्टेट बँकेने देखील नुकतेच एमसीएलआरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इतर बँकांकडून देखील व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता आहे. 

 रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत रेपो दरात कोणतीही कपात केली नाही. मात्र रिझर्व्ह बँकने चालू आर्थिक वर्षात रेपो दरामध्ये 1.35 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बॅंकांनी ग्राहकांना द्यावा, अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. मात्र, बॅंकांकडून हव्या तेवढ्या प्रमाणात कर्जदरात कपात करण्यात आलेली नाही.