एचडीएफसी बॅंक करणार 5,000 फ्रेशर्सची भरती!

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

नवी दिल्ली: देशातील आघाडीची आणि खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक, एचडीएफसी बॅंक मोठी नोकरभरती करणार आहे. डिजिटल युगातील गरजा ओळखून 5,000 फ्रेशर्सची भरती एचडीएफसी बॅंक करणार आहे. पुढील तीन वर्षात ही नोकरभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी बॅंक विविध टेनिंग इन्स्टिट्युटबरोबर करार करणार आहे. या संस्थांमधून पदवीधरांना नोकरी सामावून घेण्याआधी एक वर्षभर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एचडीएफसी बॅंकेने मणिपाल ग्लोबल अॅकेडमीशी यासंदर्भातील कराराची घोषणा केली आहे. 

मणिपाल अॅकेडमीमध्ये पदवीधरांना वर्षभर प्रशिक्षण दिल्यानंतर नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. ज्या पदवीधरांची यासाठी निवड होईल त्यांना 3.3 लाख रुपये (अधिक कर) कोर्स फी द्यावी लागणार आहे. त्यानंतर एचडीएफसी बॅंक या तरुणांना पहिल्या वर्षासाठी 4 लाख रुपये वार्षिक वेतन देणार आहे. डिजिटल बदलांमुळे आणि पर्सनल बॅंकिंगमुळे कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असलेल्या कौशल्यांमध्येही बदल होत आहेत. त्या अनुषंगानेच बॅंकसुद्धा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणार आहे. बॅंकेच्या एकूण नोकरभरतीपैकी फ्रेशर्सची भरती 68 टक्के असणार आहे. मागील वर्षभरात बॅंकेने 10,000 कर्माचाऱ्यांची भरती केली आहे. सध्या एचडीएफसी बॅंकेत एकूण 98,000 कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HDFC Bank to hire 5000 banking professionals