HDFC चे सावधगिरीचे आवाहन; फसवणुकीविरोधात मूह बंद रखो मोहीम | HDFC bank news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HDFC Bank

HDFC चे सावधगिरीचे आवाहन; फसवणुकीविरोधात मूह बंद रखो मोहीम

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : आर्थिक व्यवहार करताना (financial deal) होणारी ग्राहकांची फसवणुक (consumer financial fraud) टाळण्यासाठी एचडीएफसी बँकेतर्फे (hdfc bank) मूह बंद रखो ही मोहीम दुसऱ्या टप्प्यात चालविली जाणार आहे. सध्या फसवणूक करणारेही जास्त हुशार झाल्याचे उघड होत असल्याने त्याबाबतही ग्राहकांना सावध (consumer alert) केले जाईल.

हेही वाचा: कंगना राणावत विरोधात पालघरमध्ये तक्रार

ग्राहकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी या मोहीमेत चार महिन्यांत दोन हजार कार्यशाळा आयोजित केल्या जातील. मागीलवर्षीही बँकेने पहिल्या टप्प्यात ही मोहीम चालविली होती. आता इंटरनॅशनल फ्रॉड अवेअरनेसस वीक 2021 च्या निमित्ताने सर्व प्रकारच्या इ फसवणुकीची माहिती ग्राहकांना दिली जाईल. फसवणुक टाळण्यासाठी ग्राहकांनी दूरध्वनीवरून बँकिंगसंदर्भात कोणालाही कोणतीही माहिती देऊ नये, असे या मूह बंद रखो मोहिमेचे मुख्य सूत्र आहे. या मोहीमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती देण्यावर भर दिला जाईल.

कोरोनाच्या साथीनंतर ई फसवणुक करणारे गुन्हेगारही हुशार झाले आहेत, लोकांचा विश्वास मिळविण्यासाठी ते आणखी अद्ययावत झाले आहेत. लोकांना खरे वाटावे यासाठी हल्ली असे फसवणुक करणारे दूरध्वनी बँकेच्या कामकाजाच्या वेळेतच येतात. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत असे ई फसवणुकीचे सत्तर टक्के गुन्हे सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेतच झाले, असे बँकेच्या अभ्यासात आढळले. तसेच हे गुन्हेगार आता तरुणांना देखील लक्ष्य करीत आहेत, फसवणुक झाल्यापैकी 85 टक्के खातेदार हे 22 ते 50 वयोगटातील होते, असेही दिसले आहे. त्यामुळे खातेदारांनीच सावध राहिले पाहिजे, असे आवाहन बँकेचे एमडी शशिधर जगदीशन यांनी केले.

अनोळखी लिंक उघडू नका, आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डांचा तपशील (सीव्हीव्ही, ओटीपी) कोणालाही देऊ नका, मोबाईल-नेटबँकिंग चे लॉगीन आयडी व पासवर्ड कोणालाही सांगू नका, यासाठी समाजमाध्यमांचाही वापर करू नका, तरच तुमचे पैसे सुरक्षित राहतील, असे या मोहिमेत सांगितले जाते. नुकतेच बँकेने आयोजित केलेल्या मूह बंद रखो या व्हर्चुअल इव्हेंटचे उद्घाटन नीती आयोगाचे विशेष सचिव डॉ. के. राजेश्वर राव, नॅशनल सायबर सिक्युरिटी को ऑर्डिनेटर डॉ. राजेश पंत हजर होते.

loading image
go to top