
खाजगी बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात 4,023 नवीन शाखा उघडल्या आहेत.
एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?
नवी दिल्ली : स्टॉक एक्स्चेंजनं निवासी कर्ज देणारी कंपनी एचडीएफसी लिमिटेड (HDFC Ltd) आणि तिची बँकिंग उपकंपनी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेला दोन्ही स्टॉक एक्स्चेंजकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालंय. (HDFC & HDFC Bank Merger News)
तर, दुसरीकडं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं (AIBEA) रविवारी सांगितलं की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (PSB) आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2,044 शाखा बंद केल्या आहेत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या संख्येतही सुमारे 13 हजारांनी कपात करण्यात आलीय. सरकारी बँकांच्या शाखा झपाट्यानं बंद होत असताना, याउलट खाजगी बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात 4,023 नवीन शाखा उघडल्या आहेत. आता खासगी क्षेत्रातील बँकांच्या शाखांची संख्या 34,342 झालीय. असोसिएशनच्या मते, PSB च्या शाखांची संख्या 88,265 होती, ती आता 2022 मध्ये 86,221 वर आलीय.
हेही वाचा: BSF जवानाच्या गोळीबारात 4 जवान शहीद; कोर्टाकडून अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश
आर्थिक वर्ष 2020 मध्ये PSB च्या शाखांची संख्या 90,520 होती. तर, 2021 मध्ये PSB मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या आठ लाख सात हजार 48 होती, जी 2022 मध्ये सात लाख 94 हजार 40 वर आलीय. असोसिएशनचं म्हणणं आहे की, 2020 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर, शाखांचं एकत्रीकरण आणि कर्मचारी सेवानिवृत्तीमुळं शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी झालीय आहे.
Web Title: Hdfc Hdfc Bank Merger Proposal Approved And 2044 Government Banks Branches Closed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..