HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HDFC Bank
HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ, ९ मे पासून लागू

HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ

मुंबई : रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ४० बेसिस पॉईंटनी वाढ केल्यानंतर बँकांच्या गृहकर्जांमध्ये वाढ होणार असल्याचं बोललं जात होत. याची सुरुवात एचडीएफसी या खासगी बँकेकडून झाली आहे. HDFCनं शनिवारी आपल्या रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) ३० बेसिस पॉईंटनं वाढ केली आहे. त्यामुळं सहाजिकचं एचडीएफसीच्या गृहकर्जाच्या दरात वाढ झाली आहे. ही दरवाढ ९ मे पासून लागू होणार आहे. (HDFC hikes home loan rates for all customers to be effective from May 9)

हेही वाचा: उल्फा बंडखोरांकडून दोन सदस्यांना मृत्यूदंड; पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

एचडीएफसीनं व्याजदर वाढवल्यानं त्यांच्या ग्राहकांच्या महिन्याच्या गृहकर्जाच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. महागाईला लगाम घालण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने आता सानुकूल चलनविषयक धोरण मागे घेण्याचे संकेत दिल्याने व्याजदरात वाढ होणार आहे.

हेही वाचा: देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; तीन हजारहून नव्या रुग्णांची नोंद

दरम्यान, एसबीआयनं गेल्या महिन्यात MCLRमध्ये १० बेसिस पॉईंटनं वाढ केली होती. तर एचडीएफसी, पीएनबी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनं आपल्या MCLR पॉईंटमध्ये ५ बेसिस पॉईंटनं वाढ केली होती. यानंतर आता येत्या काळात इतर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकाही वाढ करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: उल्फा बंडखोरांकडून दोन सदस्यांना मृत्यूदंड; पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

नवे व्याजदर काय असतील?

३० लाखांपर्यंतच्या कर्जासाठी....

HDFC च्या नव्या व्याजदरांमध्ये ०.३० टक्के वाढ झाली असून ३० लाखांपर्यंत गृहकर्ज घेतलेल्या ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर ७५० च्यावर आहे. त्यांच्यासाठी पूर्वी ६.७० टक्के व्याजदर होता तो आता ७.०० टक्के असेल. तसेच महिला ग्राहकांसाठी पूर्वी ६.७५ टक्के इतका व्याजदर होता तो आता ७.०५ टक्के असेल. तसेच इतर सर्वांसाठी पूर्वीचा व्याजदर ६.८० टक्के होता तो आता ७.१० टक्के असेल.

३० ते ७५ लाखांदरम्यानच्या कर्जासाठी....

HDFC च्या ३० ते ७५ लाखांपर्यंत गृहकर्ज घेतलेल्या महिला ग्राहकांसाठी पूर्वी ७.०० टक्के इतका व्याजदर होता तो आता ७.३० टक्के असेल. तसेच इतर सर्वांसाठी पूर्वीचा व्याजदर ७.०५ टक्के होता तो आता ७.३५ टक्के असेल.

७५ लाखांहून अधिक कर्जासाठी....

HDFC च्या ७५ लाखांहून अधिक गृहकर्ज घेतलेल्या महिला ग्राहकांसाठी पूर्वी ७.१० टक्के इतका व्याजदर होता तो आता ७.४० टक्के असेल. तसेच इतर सर्वांसाठी पूर्वीचा व्याजदर ७.१५ टक्के होता तो आता ७.४५ टक्के असेल.

Web Title: Hdfc Hikes Home Loan Rates For All Customers To Be Effective From May 9

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top