
उल्फा बंडखोरांकडून दोन सदस्यांना मृत्यूदंड; पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती
गुवाहाटी : बंदी असलेली युनायटेड लिबरेशन फ्रन्ट ऑफ आसाम इंडिपेंडंट (ULFA-I) या बंडखोरांच्या संघटनेनं आपल्या दोन सदस्यांना हेरगिरी केल्याबद्दल मृत्यूदंड दिला आहे. याची माहिती या संघटनेच्या सदस्यांनी चक्क पत्रकार परिषद घेऊन जाहिर केल्यानं खळबळ उडाली आहे. (Assam ULFA I issues death sentence to two cardres for alleged spy work)
हेही वाचा: देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; तीन हजारहून नव्या रुग्णांची नोंद
उल्फाच्या पब्लिसिटी विंगनं आपल्या निवदेनात म्हटलं की, धनजीत दास आणि संजीब सर्मा या संघटनेच्या दोन सदस्यांनी संघटनेसंबंधीची माहिती पोलिसांना आणि राज्य सरकारला पुरवली. यां दोघांपैकी दास २४ एप्रिल रोजी संघटनेच्या कॅम्पमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो दुसऱ्या दिवशी संघटनेच्या हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानं संघटनेतील इतर काही सदस्यांना पोलिसांना शरण येण्याचं आणि संघटनेच्या हितचिंतकांची आणि समर्थकांची माहिती पोलिसांना देण्यासाठी मन वळवण्याचं काम करत होता.
हेही वाचा: इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागं 'हा' तांत्रिक बिघाड; सरकारी समितीला सापडलं कारण
दरम्यान, उल्फासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी सर्माला पोलीस पैसे देत होते. म्हणजेच सर्मा हा हेरगिरी करायचं काम करत होता, त्याच्याकडे अत्याधुनिक संपर्काची साधनं उपलब्ध होती.
Web Title: Assam Ulfa I Issues Death Sentence To Two Cardres For Alleged Spy Work
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..