'एचडीएफसी'कडून गृहकर्जाच्या दरात वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

मुंबई: खाजगी क्षेत्रातील कंपनी असलेल्या एचडीएफसीने गृहकर्जाच्या दरात वाढ केली आहे. रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (आरपीएलआर) एचडीएफसीने 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. नवे व्याजदर आजपासून लागू झाले आहेत. 

कंपनीकडून तीस लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज आता 895 टक्के दराने उपलब्ध होणार असून महिलांसाठी 8.90 टक्के व्याजदर असेल. त्याचप्रमाणे 30 ते 75 लाखांदरम्यानच्या गृहकर्जासाठी व्याजदर आता 9.10 टक्के व्याजदर असेल. हाच दर महिलांसाठी 9.05 टक्के एवढा असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HDFC raises lending rates by 0.10 pct.