मल्ल्याविरोधी याचिकेची सुनावणी तहकूब 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई - परागंदा आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार विजय मल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या याचिकेवरील सुनावणी विशेष न्यायालयाने तहकूब केली.

मुंबई - परागंदा आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार विजय मल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या याचिकेवरील सुनावणी विशेष न्यायालयाने तहकूब केली.

विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात मल्ल्याने उच्च न्यायालयात केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे विशेष न्यायालयाने ‘ईडी’च्या याचिकेवरील सुनावणी ८ एप्रिलपर्यंत तहकूब केली. आपल्या विरोधातील प्रकरणे सामंजस्याने सोडवण्याची तयारी असल्याचे सांगत मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सुमारे ९ हजार कोटी रुपये घेऊन पसार झालेल्या मल्ल्याने किंगफिशरच्या माध्यमातून कर्जाची रक्‍कम परत देण्याची सशर्त तयारी दाखवली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hearing of anticipatory bail petition against Vijay Mallya