वेळेत कर्ज न भरल्यानं तुमचा CIBIL Score खराब झालाय? जाणून घ्या CIBIL सुधारण्याचे सोपे उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CIBIL Score

सिबिल स्कोअर सुधारण्याचे सोपे उपाय जाणून घेऊयात

वेळेत कर्ज न भरल्यानं तुमचा CIBIL Score खराब झालाय?

वेळेवर कर्ज न फेडल्यास, तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL score) खराब होतो. सिबिल स्कोअर खराब झाल्यास पुन्हा कोणत्याही बँकेत कर्ज (Debt) घेण्यासाठी गेलात तरी तुम्हाला कर्ज मिळणार नाही आणि मिळालेच तर ते जास्त व्याजाने मिळेल.

आता प्रश्न असा आहे सिबिल स्कोअर (CIBIL score) कायमसाठीच खराब होतो का? त्यात दुसरा कोणता पर्याय नाही का?

उदाहरणाने समजून घेऊयात...

समजा तुम्ही घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे. सुरुवातीला तुम्ही कर्जाचा हप्ता भरत राहिलात पण नंतर अचानक लॉकडाऊन (Lockdown) झाला आणि तुम्हाला कर्जाचा हप्ता भरणे कठीण झाले. हप्ता बंद होताच बँक तुम्हाला डिफॉल्टच्या लिस्टमध्ये टाकते. बरं, त्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आणि तुम्ही बाकी हप्त्याची रक्कम आणि त्यावरील व्याज बँकेत भरले. आता तुम्हाला असे वाटेल असेल की तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL score) लगेच चांगला होईल. पण नाही, असे होत नाही, कमीत कमी 2 वर्ष तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL score) खराबच राहतो.

हेही वाचा: Paytm वर चेक करा तुमचा सिबिल स्कोअर; फॉलो करा 'या' टीप्स

सिबिल स्कोअरची गडबड लपत नाही

सिबिल स्कोअरचा प्रताप वाऱ्यासारखा पसरतो यात काही खोटे नाही. म्हणजेच तुमच्या सिबिल स्कोअरची नकारात्मक रँकिंग प्रत्येक बँक आणि फायनान्स एजन्सीपर्यंत पोहोचते. पुढच्या वेळी तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेत जाल किंवा कार लोन घेण्यासाठी फायनान्स कंपन्यांकडे जाल तेव्हा त्यांना तुमचा हा सिबिल स्कोअर (CIBIL score) लगेच कळेल. अशा परिस्थितीत एकतर तुम्हाला कर्ज मिळणारच नाही. एखादी बँक कर्ज द्यायला तयार झाली तरी व्याजदर वाढवून कर्ज दिले जाते.

हेही वाचा: पीककर्जासाठी बॅंकांची अट! एवढे 'सिबिल' असेल तरच मिळणार कर्ज

सिबिल स्कोअर कसा सुधारतो ?

सिबिल स्कोअर तुमचे व्यवहार आणि क्रेडिट कार्ड किंवा लहान-मोठी बिले भरताना दिसून येते. बिले भरण्यास उशीर करू नका, वेळेवर बिले भरा आणि पूर्ण भरा. उदा, संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल भरल्याने सिबिल स्कोअर सुधारतो. बरेचदा लोक कर्ज घेतल्यानंतर आणि वेळेवर परतफेड केल्यानंतर बँकेकडून NOC घेत नाहीत, ज्यामुळे सिबिल स्कोअर खराबच राहतो. तुमचा डेटा सिबिलवर अपडेट केल्यावर लगेच बँकेकडून NOC मिळायला हवी. क्रेडीट कार्डच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड बंद केले तर बँकेकडून त्याची संपूर्ण कागदपत्रे पूर्ण करा. बँकेकडून कार्ड क्लोजर सर्टिफिकेट घ्या. या सर्व गोष्टी सिबिल स्कोअर सुधारतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :corona Lockdowndebt
loading image
go to top