विप्रो: मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणाऱ्यांची चांदी

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जून 2019

बंगळूर: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांना चालू वर्षात चांगली वेतनवाढ देऊ केली आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत विप्रोने कमर्चाऱ्यांच्या वेतनात सरासरी उच्च वेतन वाढ केली आहे. साधारण 6 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान ही वाढ असणायचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. येत्या 1 जूनपासून ही वेतनवाढ लागू होणार आहे.

भारतातील कर्मचाऱ्यांना परदेशातील विशेषत: अमेरिका आणि युरोपातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त वेतनवाढ देण्यात येणार आहे. मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) यासारख्या डिजिटल तंत्रज्ञानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने विशेष भत्त्यांचीही घोषणा केली आहे. त्यातही जे कर्मचारी तरुण आहेत आणि आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या टप्प्यात आहेत आणि भविष्यात महत्त्वाचा बदल घडवणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आहेत त्यांना अधिक वेतनवाढ आणि भत्ते देण्याचे कंपनीचे धोरण आहे.

आयटी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या विप्रोचे 1 लाख 79 हजार 367.24 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 297.20 रुपयांवर व्यवहार करतो आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High single-digit pay hike for Wipro staff in FY20