esakal | ऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी  
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी  

यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी  

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बॅंकांना सुट्टी (Bank Holiday) असणार आहे.  रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका रविवारव्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बंद असतात.

ऑक्टोबर महिन्यात काही अतिरिक्त सुट्ट्या आल्याने या महिन्यात जवळपास 15 दिवस बँकांना सुट्टी असेल. जर तुम्हाला बँकेत जाऊन कोणत्याही बँकिंग कामाची विल्हेवाट लावायची असेल तर त्या दिवशी बँकेची सुट्टी नाही हे आपल्याला माहीत असले पाहिजे.

Corona Updates - देशात पुन्हा रुग्णवाढीचा कहर; आकडेवारी चिंता वाढवणारी

तारिख  सुट्टी
2 महात्मा गांधी जयंतीमुळे देशभरात बँकांना सुट्ट्या असतील.
4  रविवार ही बँकांची साप्ताहिक सुट्टी असेल
10  महिन्याचा दुसरा शनिवार सुट्टीचा असेल.
11 रविवार
17  राज्यातील सणांमुळे आसाम आणि मणिपूरमधील बँका बंद राहतील.
18 रविवार
23 दुर्गा महासप्तमी (या दिवशी त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि मेघालयात बँका बंद राहतील)
24 दुर्गा महामाष्टमी तसेच चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
25 रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील
26 विजया दशमीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
27-28 दुर्गापुजेमुळे सिक्कीममध्ये बॅंकाना सुट्टी असेल. 
29 पैगंबर मोहम्मद जयंती आणि दुर्गापूजेमुळे सिक्कीम, जम्मू, कोची, काश्मीर आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
30 ईद-ए-मिलादचा सण आहे ( त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, इम्फाळ, जम्मू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड आणि काश्मीर येथे बँका बंद राहतील)
31 सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (गुजरात, कर्नाटक, ओडिशा आणि शिमला येथील बँका बंद राहणार आहेत)
 


आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यानं आणि सणासुदीच्या दिवसात बँकांची कामे अशा सुट्ट्यांमुळे खोळंबण्याची शक्यता आहे. महिन्याभरात सलग दोन ते तीन दिवसही बँकांना सलग सुट्टी येणार असल्यानं ग्राहकांना बँकेची कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.

eSakal