वर्षभरापूर्वी घर नोंदणी रद्द करणाऱ्यांना ‘जीएसटी’ परतावा

पीटीआय
Thursday, 9 May 2019

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जीएसटी सुधारणानंतर ग्राहक आणि विकासकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ते दूर करण्यासाठी बुधवारी (ता. ९) केंद्रीय अप्रत्यक्ष आणि सीमा शुल्क विभागाने बुधवारी स्थावर मालमत्तांवरील जीएसटीसंदर्भातील सामाईक प्रश्‍नोत्तरांचा संच जाहीर केला. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षात घराची नोंदणी रद्द करणाऱ्या ग्राहकांना विकासकांनी जीएसटी परतावा देण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली - गेल्या आर्थिक वर्षात घराची नोंदणी रद्द करणाऱ्या ग्राहकांना वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) परतावा मिळणार आहे. 

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जीएसटी सुधारणानंतर ग्राहक आणि विकासकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ते दूर करण्यासाठी बुधवारी (ता. ९) केंद्रीय अप्रत्यक्ष आणि सीमा शुल्क विभागाने बुधवारी स्थावर मालमत्तांवरील जीएसटीसंदर्भातील सामाईक प्रश्‍नोत्तरांचा संच जाहीर केला. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षात घराची नोंदणी रद्द करणाऱ्या ग्राहकांना विकासकांनी जीएसटी परतावा देण्याचे निर्देश दिले आहेत. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षात खरेदी केलेल्या घराची नोंदणी रद्द झाल्यास किंवा किमतीत बदल झाल्यास संबंधिताला क्रेडिट नोट सादर करून जीएसटी कराचा लाभ मिळेल. यासाठी विकासकाला त्याच्या कर भरण्यात सूट मिळेल, असे या प्रश्‍नोत्तरांमध्ये म्हटले आहे; मात्र नेमका किती टक्के जीएसटीचा परतावा मिळेल, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. कर परताव्याबाबत १० मेपर्यंत बांधकाम व्यावसायिकांना आपली मते मांडण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Registration Cancel GST Return