असा अडकला नीरव मोदी जाळ्यात... 

वृत्तसंस्था
Thursday, 21 March 2019

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच पकडून दिले. इंग्लंडमधील बँक कर्मचाऱ्याच्या हुशारीने नीरव मोदीला पकडण्यास यश आले. लंडनमध्ये मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी नीरव मोदी गेला होता. नीरव मोदीला पाहता क्षणीच तो 'ठग ऑफ पीएनबी' असल्याचे म्हणजेच पीएनबीला कोट्यवधींचा गंडा लावणारा असल्याचे लक्षात येताच बँकेतील कर्मचाऱ्याने त्याला ओळखले आणि त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच पकडून दिले. इंग्लंडमधील बँक कर्मचाऱ्याच्या हुशारीने नीरव मोदीला पकडण्यास यश आले. लंडनमध्ये मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी नीरव मोदी गेला होता. नीरव मोदीला पाहता क्षणीच तो 'ठग ऑफ पीएनबी' असल्याचे म्हणजेच पीएनबीला कोट्यवधींचा गंडा लावणारा असल्याचे लक्षात येताच बँकेतील कर्मचाऱ्याने त्याला ओळखले आणि त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. आणि अवघ्या काही क्षणातच स्कॉटलँड यार्डचे पथक नीरव मोदीला अटक करायला दाखल झाले. इंग्रजी वृत्तसंस्था टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे. लेटर ऑफ इन्टेन्ट 

पीएनबी बँकेच्या 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' चा गैरवापर करत नीरव मोदीने व्यवसाय वाढीसाठी बँकेचे पैसे वापरले होते. मात्र, हा गैरव्यवहार उघड होण्यापूर्वीच नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि त्यांचे कुटुंबीय देशाबाहेर पळाले होते. 

नीरव मोदीने त्याच्या वकिलांमार्फत पोलिसांसमोर शरण जाण्याची तयारी दर्शवली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 25 मार्च रोजी नीरव मोदी वकिलांसोबत पोलिसांसमोर हजर होणार होता, असे सांगितले जात आहे. मात्र, नीरव मोदीचा हा प्रयत्न फसला आणि शेवटी त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. अटकेनंतर नीरव मोदीने लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच कर भरल्याचे आणि प्रवासाचे कागदपत्रही सादर केले होते. परंतु जिल्हा न्यायाधीश मॅरी मॅलान यांनी जामीन अर्ज नामंजूर करत 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

दरम्यान नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचे अधिकारी प्रत्यर्पणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन पुढील आठवड्यात लंडनला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How A Bank Clerk's Alert Led To Nirav Modi's Arrest