esakal | आर्थिक नियोजन कसे कराल?
sakal

बोलून बातमी शोधा

Financial-Planning

नियोजन हे कोणतेही काय यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असते. आर्थिक बाबींमध्येही नियोजन तितकेच महत्त्वाचे ठरते. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि संपत्ती निर्मितीसाठी आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. हे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या मानसिक आणि वर्तनात्मक बाबींचा सावध विचार आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजन वेगवेगळे असते.

आर्थिक नियोजन कसे कराल?

sakal_logo
By
विजय तावडे

तुम्हाला आर्थिक नियोजन करायचे आहे, मग या टिप्स वाचायलाच हव्यात
नियोजन हे कोणतेही काय यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असते. आर्थिक बाबींमध्येही नियोजन तितकेच महत्त्वाचे ठरते. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि संपत्ती निर्मितीसाठी आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. हे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या मानसिक आणि वर्तनात्मक बाबींचा सावध विचार आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजन वेगवेगळे असते. तरुण वयात किंवा अगदी करीयरच्या सुरूवातीच्या काळातच काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. तरुण विवाहित जोडप्यांनीदेखील यासंदर्भात त्यांच्या आर्थिक योजना आखणे महत्त्वाचे ठरते. जीवनाचा नवीन प्रवास करत असताना त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या मुलांना यशाची शिडी चढण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या आर्थिक बाबतीत चांगली योजना बनविणे अत्यंत महत्वाचे असते. प्रभावी आर्थिक नियोजनासाठी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्या पुढील प्रमाणे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१.  भविष्यातील आपल्या इच्छा आकांक्षा काय आहेत? प्रत्येकाने त्याचे  अल्पकालीन आणि दीर्घकालीन भविष्य काय असेल आणि त्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याची कल्पना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.  त्यांनी स्वतःला काही विशिष्ट बाबींवर प्रश्न विचारले पाहिजेत; आम्ही आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर खुश आहोत का?  त्या पातळीवर पोहोचण्यासाठी आपण काय केले पाहिजे?  याचा विचार करायला हवा.

२.  रोख पैशाची आवक आणि जावक याचे निरीक्षण करा: योग्य आर्थिक नियोजनापासून सुरुवात करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या दरमहिन्याच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे अचूक आकलन करणे गरजेचे आहे. यामुळे सद्य आर्थिक परिस्थिती संदर्भात अंदाज बांधण्यास मदत होईल व यावर पुढील नियोजन ठरविता येईल.

३.      विमा :  प्रत्येकाने योग्य वेळीच विमा (आयुर्विमा आणि आरोग्यविमा)घेणे आवश्यक आहे.  त्यासाठी काही प्रमाणात पैशांची बचत करणे प्रत्येकासाठी  महत्वाचे आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या विमा योजना बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने काळजीपूर्वक आपल्यासाठी योग्य असलेली विमा पॉलिसी निवडली पाहिजे. त्यासाठी ते आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकतात.

४.      कर नियोजनः भारतातील प्रत्येक नोकरदार, व्यावसायिकाने उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी प्रभावी कर नियोजन केले पाहिजे. ते गृह कर्ज घेऊ शकतात, विमा पॉलिसी किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा मालमत्ता भाड्याने देऊ शकतात. हा निर्णय चर्चा करून, मार्गदर्शन घेऊन घेतला पाहिजे.

५.    गुंतवणूकीचे नियोजनः विमा, बचत आणि उत्पन्नाची काळजी घेण्याव्यतिरिक्त प्रत्येकाने गुंतवणूकींवरही विचार केला पाहिजे. यात म्युच्युअल फंड, बॅंकेतील किंवा पोस्टातील मुदतठेवी, सोने, रिअल इस्टेट, करबचतीसाठीच्या विविध योजना इत्यादींचा उल्लेख करता येईल. यामध्ये गुंतवणूक करताना सल्लागारासोबत काळजी पूर्वक योजना आखली पाहिजे.

६.    आर्थिक सल्लागाराची नेमणूक:  बर्‍याच वेळा सर्वसामान्य नागरिक गोंधळात पडतात आणि विविध आर्थिक निर्णयाबद्दल घाबरतात. आपण गुंतवणूक करू नये किंवा गुंतवणूक करावी का? आपण गृह कर्ज घ्यावे का? करबचत कशी करावी? कोणत्या गुंतवणूक करावी ? नेमकी कोणती विमा पॉलिसी घ्यावी? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. यासाठीच आर्थिक सल्लागार नेमणे खूप महत्त्वाचे ठरते. आर्थिक सल्लागारकडून अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि पुढील मार्ग सुकर होतो.

७.     सातत्याने पुनरावलोकन: आर्थिक परिस्थितीचा आढावा न घेणे ही चूक अनेकदा होते. त्यामुळे बर्‍याच काळासाठी आर्थिक समस्या निर्माण झाल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणूनच, सल्ला दिला जातो की आपली आवक व संपत्ती, मालमत्ता व जबाबदाऱ्या इत्यादींचा आढावा घेण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी वेळ काढावा.

८.  पैशांच्या बाबतीत वारंवार चर्चा करा: आर्थिक विषयावर प्रत्येक घरात चर्चा होणे श्रेयस्कर ठरते. कुटुंबातील प्रत्येकाने या चर्चेत सहभागी झाले पाहिजे. त्यामुळे सर्वांना या बाबत योग्य ते आकलन होतेच, शिवाय चर्चा केल्यामुळे सर्वांनाच कुटुंबांतील आर्थिक बाबींची जाणीवदेखील होते. भविष्यातील अनेक चुका यामुळे टाळल्या जाऊ शकतात.

काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजनाद्वारे, आपण केवळ स्वत:साठीच नाही तर मुलांसाठीसुद्धा एका सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो.

loading image
go to top