
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्रायोगिक तत्वावर ‘बीटा व्हर्जन' प्राप्तिकर विभागाच्या ई-फाईलिंग संकेतस्थळावर फेब्रुवारीपासून उपलब्ध केले होते.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी आधार-आधारित 'ई-केवायसी'च्या माध्यमातून त्वरीत पॅनकार्ड देण्याची सुविधा सुरू केली. आधार क्रमांकाशी म्हणजेच 'यूआयडीएआय डेटाबेस'मध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर असेल तर लगेच पॅन क्रमांक मिळणार आहे.
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; वाचा सविस्तर बातमी
'रिअल टाईम' आधारावर ही सुविधा सुरू करण्यात आली असून हे पूर्णपणे 'पेपरलेस' आहे. इन्स्टंट पॅन सुविधा गुरुवारी औपचारिकपणे सुरू करण्यात आली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्रायोगिक तत्वावर ‘बीटा व्हर्जन' प्राप्तिकर विभागाच्या ई-फाईलिंग संकेतस्थळावर फेब्रुवारीपासून उपलब्ध केले होते. फेब्रुवारीपासून करदात्यांना 6.7 लाखाहून अधिक त्वरित पॅन कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
आणखी वाचा - पुण्यात स्थिती चिंताजनक, कंटेन्मेंट झोनबाहेर पसरतोय कोरोना
त्वरित पॅन कार्ड कसे मिळवाल?
त्वरित पॅनकार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग संकेतस्थळावर जाऊन आपला आधार नंबर टाका आणि आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर 'ओटीपी' येईल. तो 'ओटीपी' प्रणालीमध्ये टाकल्यावर ही प्रक्रिया पूर्ण होईल. मग पोर्टलवरून ई-पॅन कार्ड डाऊनलोड करता येईल. आधार नोंदणीकृत असल्यास, ई-पॅन अर्जदाराच्या ईमेल आयडीवर देखील पाठवले जाते.