
आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत, हे जाणून घेणे खूप सोपे आहे, हे अनेकांना माहित नाहीये.
नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजणांच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना आपल्या प्रॉविडंट फंडमधून (पीएफ) पैसे काढण्याची वेळ आली. मात्र, अनेक लोक असेही आहेत ज्यांना आपल्या पीएफ अकाऊंटबद्दल फारशी माहितीच नसते. त्यात किती पैसे जमा झालेत याचाही ताळेबंद त्यांना नसतो. आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत, हे जाणून घेणे खूप सोपे आहे, हे अनेकांना माहित नाहीये. आपला पीएफ बॅलन्स किती आहे, हे जाणून घ्यायचे तसे अनेक मार्ग आहेत. याबाबतची सर्व माहिती Employees' Provident Fund Organisation (EPFO) www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.
मिस्ड कॉल करुन जाणून घ्या आपला पीएफ बॅलन्स
मात्र, या अनेक उपायांपैकी सर्वांत सुलभ आणि जलद उपाय म्हणजे मिस्ड कॉल पद्धती... तुम्ही फक्त एक मिस्ड कॉल करुन आपल्या पीएफ अकाऊंटमधील बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्याला आपल्या पीएफ अकाऊंटसाठी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वापरावा लागेल. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल करुन आपण ही माहिती मिळवू शकता. या मिस्ड कॉलनंतर आपल्याला एक टेक्स्ट मॅसेज येईल ज्यामध्ये आपल्याला आपल्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत याची माहिती मिळेल.
टेक्स्ट मॅसेज करुन जाणून घ्या आपला पीएफ बॅलन्स
याशिवाय, आपण टेक्स्ट मॅसेज करुनही आपला पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. अर्थात या दोन्हीही सेवांसाठी आपला यूएएन म्हणजेच युनिव्हर्सल अकाऊंट नंबर ऍक्टीव्ह असायला हवा. जर आपल्याला एसएमएसच्या द्वारे पीएफ बॅलन्स जाणून घ्यायचा असेल तर EPFOHO UAN टाईप करुन 7738299899 या नंबरवर पाठवून टेक्स्ट मॅसेज पाठवून द्या. या सेवेचा लाभ आपण हिंदी, इंग्रजी, मराठीसहित 10 भाषांमध्ये घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर आपल्याला मराठीमध्ये आपला पीएफ बॅलन्स जाणून घ्यायचा असेल तर EPFOHO UAN MAR टाईप करुन 7738299899 या नंबरवर पाठवून द्या.
वेगवेगळ्या भाषांसाठी वेगवेगळे कोड आहेत.
1. इंग्रजीसाठी कोणताही कोड नाही.
2. हिन्दी- HIN
3.पंजाबी - PUN
4. गुजराती - GUJ
5. मराठी - MAR
6. कन्नड़ - KAN
7. तेलुगु - TEL
8. तमिल - TAM
9. मलयालम - MAL
10. बंगाली - BEN