सेव्हिंग करण्याचा भन्नाट फॉर्म्युला, पैसे होतील डबल!

Money-Saving
Money-Saving
Summary

दर महिन्याला पगार येतो आणि कसा खर्च होतो कळतच नाही, तुमच्याही बाबतीत असेच होते का ? पगारातून फक्त खर्च या समीकरणाशिवाय पगार-बचत-खर्च असे चक्र सुरु करा.

दर महिन्याला पगार येतो आणि कसा खर्च होतो कळतच नाही, तुमच्याही बाबतीत असेच होते का ? पगारातून फक्त खर्च या समीकरणाशिवाय पगार-बचत-खर्च असे चक्र सुरु करा. कारण असे केल्यानेच तुमची छोट्यातली छोटी बचत मोठमोठी स्वप्न पूर्ण करेल. पाहुयात बचतीचा फार्म्युला...(Finance latest marathi news)

पैसे जमा करण्याचा पहिला नियम

रूल ऑफ 72 (Rule of 72) इनव्हेस्टमेंट – सगळ्यांनाच वाटत असते आपले पैसे दुप्पट व्हावेत. हा नियम कसा काम करतो पाहुयात. समजा तुमच्याजवळ 20,000 रुपये आहेत. या पैशांना गुंतवा आणि यातून जे रिटर्न मिळणार आहेत ते खर्च करा. पण रक्कम दुप्पट (How to double investment) कधी होणार ? याचसाठी आहे रूल ऑफ 72. गुंतवणुकीची स्कीम जेवढे व्याज देईल त्याला 72 ने भागा आणि उत्तर तुमच्या समोर असेल.

उदाहरण घेऊया...

72 ला 8 ने भागल्यास उत्तर आले 9 वर्ष. म्हणजे जर तुमच्या गुंतवणुकीवर 8 टक्के व्याज मिळते आहे तर तुमची गुंतवलेली रक्कम येत्या 9 वर्षात दुप्पट होईल. खाली दिलेल्या तक्त्यावरुन व्याज बघून तुम्हाला समजेल की किती वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.

Money-Saving
मोदी परिधान करतात तो 'श्वास मास्क' बनविणारी इ-स्पिन नॅनोटेक स्टार्टअप

व्याज दर रूल ऑफ 72 किती वर्षात पैसे दुप्पट होणार

1 72/1 72

2 72/2 36

3 72/3 24

4 72/4 18

5 72/5 14.4

6 72/6 12

7 72/7 10.2

8 72/8 09

9 72/9 08

10 72/10 07.2

11 72/11 06.5

12 72/12 06

Money-Saving
करन्ट अकाउंटसंबंधी नवे नियम लागू करण्याचे RBIचे बँकाना निर्देश

रूल ऑफ 114

पैसे तिप्पट करायचे असतील तर रूल ऑफ 114 तुमची मदत करेल. फॉर्मूल्या रूल ऑफ 72 चाच आहे, पण आकडे बदलतील आणि तुम्ही व्याजाच्या आधारावर कॅलक्युलेट करुन ठरवाल किती वर्षांत पैसे तिप्पट होतील. समजा तुम्ही 8 टक्के दराने गुंतवणूक केली तर 114 ला 8 ने भागा, उत्तर येईल 14.2, अर्थात 14 वर्ष 2 महिन्यात तुमचे पैसे तिप्पट होतील.

रूल ऑफ 144

या नियमामपळे समजेल किती वर्षांत तुमचे पैसे चार पट होतील. जर 12 टक्के व्याजावर 10,000 रुपयांची गुंतवणूक केली तर याचे 40,000 रुपये व्हायला 12 वर्ष लागतील. यातही तुम्हाला 144 ला व्याजदराने भागावे लागेल. तेव्हा तुम्हाला समजेल किती वर्षांत तुम्हाला 4 पट पैसे मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com