कोरोना काळात पर्सनल फायनान्स कसे हाताळावे? जाणून घ्या

personal-finance
personal-financegoogle

कोरोना व्हायरस मुळे लावण्यात आलेल्या देशभरातील लॉकडाऊनचा अर्थव्यवस्था आणि व्यवसायांवर खोलवर परिणाम झाला आहे. या काळात कंपन्यांमध्ये लॉकडाउन आता देखील सुरू आहे, अशा परिस्थितीत लोकांच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम झाला आहे. या अनिश्चिततेच्या वेळी, प्रत्येक जणाने स्वत:चे आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. घराचे बजेट तयार करणे ही पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटची पहिली पायरी आहे. अशा प्रकारे, आपण आपले आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च जाणून घेऊ शकाल आणि आवश्यक उपाय करू शकाल. (How to handle personal finance during the Corona period)

या कोरोना संकटाच्या काळात आपण करत असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे हा योग्य मार्ग नाही. त्याऐवजी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करून खर्चावर नियंत्रण ठेवू शकता. आपले लक्ष हे जास्तीत जास्त बचत करण्याकडे असले पाहिजे.

दररोजच्या जीवनात आवश्यक गोष्टींवर खर्च करण्याकडे तुमचा कल असला पाहिजे. अनावश्यक खर्च कमी करुन आपण आपले बजेट सांभाळू शकता. सध्या कोरोनाच्या काळात बरेच लोक घरून काम करत आहेत. अशा परिस्थितीत प्रवास आणि खाण्यापिण्यात खर्च होणारा पैसा इतर आर्थिक गरजांसाठी वापरला पाहिजे. ही बचत तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.

personal-finance
Farmers Protest: पवारांच्या सूचनेचं स्वागतच! तोमरांची तोडगा काढण्याची तयारी

एखाद्यासाठी आपत्कालीन वेळेसाठी प्रत्येकाने बचत करणे गरजेचे आहे. आपत्कालीन बचत तीन ते सहा महिन्यांच्या कालावधी दरम्यान घरगुती खर्च भागविण्यासाठी आवश्यक आहे. परंतु सध्या कोरोनाच्या काळात सर्व देशभरात लॉकडाउनच्या असल्यामुळे ही बचत कमीत कमी अंदाजे एक वर्षाच्या काळासाठी असवी पाहिजे. हे पैसे कठीण काळात वापरले जाऊ शकतात.

लोकांनी वेगवेगळ्या स्वरूपात गुंतवणूकीचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्या रिटायरमेंट नंतर साठीच्या बचतीत अधिक हातभार लावावा. मार्केटमध्ये सतत चढ-उतार होत राहातात. अशा परिस्थितीत आपण आपल्या रिटायरमेंट प्लॅनकडे लक्ष देणे गरजेचे ठरते.

आरोग्य विमा

कोरोना रोगाने आपल्या सर्वांना शिकवलेली एक गोष्ट म्हणजे वाईट काळासाठी कायम तत्पर राहणे. अशा कठीण काळात आपण घेतलेले विमा संरक्षण हे आपले आपत्कालीन काळासाठी ठेवलेला निधी वापरण्यापासून वाचवते, तसेच त्यामुळे तुमच्या परिवारातील व्यक्तींना देखील संरक्षण मिळते. आरोग्य आणि जीवन विमा हा कोणत्याही आर्थिक योजनेचा भाग असतो. विमा संरक्षण नसताना आपल्याला हॉस्पिटलची बिले भरणे अवघड जाते म्हणूनच आपल्या या गरजेची काळजी घेणारी पॉलिसी खरेदी करा.

personal-finance
देशात ऑडीच्या इलेक्ट्रिक कारसाठी बुकिंग सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com