esakal | भारतातून अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी कराल ?
sakal

बोलून बातमी शोधा

share market news

भारतातून अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी कराल ?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई - अमेरिकी शेअर बाजारात गेल्या महिन्याभरात चांगली तेजी पाहायला मिळाली आहे. अमेरिकी शेअर बाजारातील नॅसडॅक (nasdack) 100 निर्देशांक येत्या काळात १५ हजारांचा महत्त्वाचा टप्पा गाठताना पाहायला मिळेल. अशातच अमेरिकेतील हेवी वेट 'टेक' शेअर्सचा इंडेक्स वर्ष अखेरीस २० हजारांचा पल्ला गाठेल असं बोललं जातंय. 13 तारखेच्या ट्रेंडिंग सत्रात NDX ने १४ हजार ९०० चा पल्ला गाठलेला पाहायला मिळाला. (how to invest in top US stocks from India article releted share market yst88)

महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी म्हणजेच जून 2020 मध्ये नॅसडॅक 100 निर्देशांकाने पहिल्यांदाच १० हजारांचा टप्पा गाठल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर केवळ वर्षभरात आपल्याला अमेरिकी शेअर बाजारातील नॅसडॅक 00 इंडेक्स 50 टक्क्यांनी वधारलेला पाहायला मिळतोय. डिसेंबर 2021 पर्यंत Nasdaq-100 या इंडेक्स ला 20 हजारांना स्पर्श करण्यासाठी सध्याच्या पातळीवरून जवळपास 33 वृद्धी होणं अपेक्षित आहे. (how to invest in top US stocks from India )

फेसबुक (facebook), ऍमेझॉन (amezon), अॅपल (apple), नेटफ्लिक्स (netflix) आणि गुगल (google) या सारख्या काही उत्तम कंपन्या अमेरिकी शेअर बाजारातील नॅसडॅक 100 निर्देशांकातील महत्त्वाचा भाग आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये होणारी वृद्धी येत्या काळात नॅसडॅक इंडेक्सला नवनव्या शिखरांवर घेऊन जाऊ शकतात. नॅसडॅक 100 ने गेल्या 12 महिन्यांत जवळपास 48 टक्क्यांची वृद्धी दाखवली आहे. गेल्या पाच वर्षांचा प्रवास पहिला तर हाच इंडेक्स मागील पाच वर्षांत अंदाजे 200 टक्के वधारला आहे. गेल्या दहा वर्षांत साधारण नॅसडॅक 100 साधारण 550 टक्के वधारलेला पाहायला मिळाला आहे.

हेही वाचा: लष्करी कर्मचारीच निघाला ‘घरचा भेदी’; ‘ISI’च्या हस्तकासह दोघांना अटक

हेही वाचा: 'ही राजकीय सूडवृत्तीच'; मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टवर ममतांचा पलटवार

loading image