Weight Loss Diet : नव्या वर्षात तरी बारीक व्हायचं मनावर घ्या; असा घ्या आहार

यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. या आहारामुळे ३ महिन्यांत १५ किलो वजन कमी होईल.
Weight Loss Diet
Weight Loss Diet google

मुंबई : पटकन स्लिम होण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात योग्य बदल कराल, तेव्हा वजनही कमी होईल आणि तुम्ही सुदृढ दिसू लागाल.

७०:३० फॉर्म्युला तुमची चरबी जाळण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. यामध्ये तुमचा आहार खूप महत्त्वाचा असतो. ७० टक्के आहार आणि ३० टक्के व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता.

यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. या आहारामुळे ३ महिन्यांत १५ किलो वजन कमी होईल.

Weight Loss Diet
Weight Loss : थंडीत वजन वाढतंय ? हे उपाय करा

पहाटे - लिंबूसरबत

सकाळी ७ वाजता

सकाळी बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक आहे, त्यामुळे उठून कोमट पाण्यात लिंबू टाकून प्या. यामुळे तुमची पचनक्रियाही निरोगी राहते. हे पाणी तुम्ही रोज बदलून पिऊ शकता. दिवसाची सुरुवात एक दिवस लिंबू सरबत, दुसर्‍या दिवशी ओव्याचे पाणी आणि मेथीचे पाणी पिऊन करा.

नाश्ता - दुधीचा हलवा

सकाळी ८:३० च्या सुमारास

सकाळच्या नाश्त्यात दुधीचा हलवा नक्की खा. दुधीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी वजन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुमचे पोटही बराच काळ भरलेले राहाते. १/२ कप दही आणि १ सफरचंद चीजसोबत खा.

याशिवाय, तुम्ही ब्राऊन ब्रेडच्या २ स्लाइसचे सँडविच घेऊ शकता ज्यामध्ये भाज्यांचे स्टफिंग ठेवले जाते. तुम्ही हे रोज बदलू शकता आणि चटणी किंवा सांभरसोबत २ इडल्या, २ साधे गव्हाचे डोसे खाऊ शकता.

१ तासानंतर ग्रीन टी प्या जे तुमचे चयापचय वेगवान होण्यास मदत करेल.

Weight Loss Diet
Weight Gain : हलक्याफुलक्या शरीराचं असं वाढवा वजन

दुपारचे जेवण - लिंबू भात आणि सांभर

१.३०च्या सुमारास

दुपारच्या जेवणात तुम्ही लिंबू भात आणि सांभर खाऊ शकता. याशिवाय २ चपात्या मिक्स व्हेज आणि १/२ वाटी डाळी घ्या. हेदेखील दररोज बदलले जाऊ शकते. दुपारच्या जेवणासाठी तुम्ही नाचणी इडली आणि सांभर, संपूर्ण गव्हाची व्हेज दलिया आणि अर्धा कप दही घेऊ शकता.

दुपारचे जेवण – ग्रीन टी/मसाला चहा

दुपारी ४च्या दरम्यान

ग्रीन टी आणि मसाला चहा वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. मसाला चहा पचन सुधारते आणि चांगल्या पचनासोबत तुमची चयापचय क्रियादेखील सुधारते. मसाला चहा तुमची चयापचय गती वाढवण्यास मदत करतो. या दोन्ही गोष्टी तुम्हाला चरबी जाळण्यास मदत करतात.

रात्रीचे जेवण - क्विनोआ

संध्याकाळी ७:३० वा.

रात्रीचे जेवण हलके असावे, परंतु ते अजिबात वगळू नका. रात्रीच्या जेवणात तुम्ही व्हेज क्विनोआ खाऊ शकता. त्याच वेळी, कधी कधी १ चपाती आणि कोणतीही १ भाजी एकत्र घ्या. रात्रीच्या वेळीही तुमच्या ताटात सॅलड नक्की असू द्या.

रात्रीच्या जेवणानंतर - दालचिनी-आले-लिंबू सरबत

रात्री ९ वाजता

झोपण्याच्या १ तास आधी हे पेय तयार करून प्यायल्याने तुम्हाला फायदा होईल. अन्न पचवण्यासोबतच चरबी लवकर जाळण्यासही मदत होते.

रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच बसू नका. थोडे चालल्यानंतर, झोपायला जा. यासोबतच सकाळी नियमितपणे व्यायाम करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com