esakal | कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, पीपीएफ, ईपीएफ, एफडी अन् एनपीएस खात्यातून कसे काढायचे पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

provident fund

कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, बचत खात्यातून कसे काढायचे पैसे

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला आहे. अनेकांनी घरचा कर्ता पुरुष गमावला, तर अनेकांचं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. या काळात आर्थिक अडचणींमुळे अनेकांना उपचार घेणे देखील शक्य होत नाही. अशा अडचणीच्यावेळी भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा फिक्स डिपॉझिट या बचतीमधून तत्काळ पैसे काढता येऊ शकतात. पीपीएफ (ppf) , अडचणीच्या काळात ईपीएएफ (EPF), एफडी (FD) अन् एनपीएस (NPS) खात्यातून पैसे कसे काढायचे ते जाणून घेऊयात. (how to withdrawl emergency amount from ppf epf nps and fd account)

हेही वाचा: देशी क्रिप्टोकरंसी 'पॉलिगॉन' पोहचली जगातील टॉप 20 मध्ये

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) :

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या नियमानुसार, खातं उघडल्यानंतर कर्मचाऱ्याला पाच वर्षानंतर निधी काढता येतो. मात्र, एकूण रकमेपैकी ५० टक्के निधी पाच वर्षांच्या आधी देखील काढता येतो. हा निधी आर्थिक वर्षातून केवळ एकदाच काढता येतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच भविष्य निर्वाहच्या खात्यातून अचानक पैसे काढल्यास लागणाऱ्या करामधून देखील सूट देण्यात आली आहे. हा निधी काढून घेण्यासाठी पीपीएफ खाते असलेल्या बँकेच्या संबंधित शाखेत फॉर्म सी भरून सादर करणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही भविष्य निर्वाह निधीच्या संकेतस्थळावरून देखील ऑनलाइन फॉर्म भरू शकता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) :

नोकरीवरून काढून टाकणे किंवा वैद्यकीय समस्या अशा काही गोष्टी वगळता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी टॅक्स लागतो. दरम्यान, पाच वर्षानंतर हा निधी काढायचा असेल तर कुठलाही टॅक्स लागत नाही.

फिक्स डीपॉझिट (FD) -

फिक्स डीपॉझिटमध्ये वर्ष पूर्ण होण्यापूर्वी निधी काढता येत नाही. मॅच्युरिटीच्या आधी एफडी अकाउंट बंद केले तरच हा निधी काढता येतो. तसेच मुदतीच्या आधी रक्कम काढल्यास ०.५ टक्के ते १ टक्का टॅक्ससुद्धा लागतो.

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) -

राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर खात्यातून रक्कम काढता येते. मात्र, पूर्ण रक्कम मिळत नाही. फक्त एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम काढता येते. तसेच या योजनेमधून पैसे काढताना कुठलाही टॅक्स लागत नाही.

loading image