esakal | देशी क्रिप्टोकरंसी 'पॉलिगॉन' पोहचली जगातील टॉप 20 मध्ये, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

polygon

जगभरात वेगवेगळ्या देशांत तयार करण्यात आलेल्या असंख्य क्रिप्टोकरंसी (cryptocurrency) आहेत. ज्यांच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते काही मोजकी नावे सोडली जसे की, बिटकॉईन (Bitcoin), इथीरियम (Etherium), डोजकॉईन (Dogecone) इत्यादी तर उरलेल्या डिजीटल करंसीबद्दल फार थोड्या लोकांना माहिती असते.

देशी क्रिप्टोकरंसी 'पॉलिगॉन' पोहचली जगातील टॉप 20 मध्ये

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जगभरात वेगवेगळ्या देशांत तयार करण्यात आलेल्या असंख्य क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) आहेत. ज्यांच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते काही मोजकी नावे सोडली जसे की, बिटकॉईन (Bitcoin), इथीरियम (Etherium), डोजकॉईन (Dogecone) इत्यादी तर उरलेल्या डिजीटल करंसीबद्दल फार थोड्या लोकांना माहिती असते. दरम्यान भारतात सुरु झालेली एक क्रिप्टोकरन्सी आज जगातील टॉप 20 मध्ये पोहचली आहे. आज आपण याच देसी क्रिप्टोकरंसी 'पॉलिगॉन' बद्दल जाणून घेणार आहोत. (india made cryptocurrency polygon is now among-worlds top 20 crypto coins)

तीन भारतीय लोकांनी मिळून polygon ही क्रिप्टोकरन्सी बनवली आहे. या इथीरियम ब्लॉकचेनवर आधारीत या क्रिप्टोकरन्सीनी मागील आठवड्यात सारे रेकॉर्ड मोडित काढले काही दिवसातच याचे बाजरा भांडवल 10 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. सध्या त्याचे बाजार भांडवल 13 अब्ज डॉलर्स आहे आणि या सोबतच हे भारतीय डिजिटल चलन जगातील पहिल्या 20 क्रिप्टोमध्ये सामील झाले आहे.

2017 साली सुरु झालेले हे डिजीटल चलन तेव्हा मेटिक नेटवर्क म्हणून ओळखले जात असे. फेब्रुवारीपासून त्याचे दर दहा पटींनी वाढले आहेत. त्याच्या किंमती वाढल्यामुळे, ब्लॉकचेनमध्ये त्याचा हस्तक्षेप वाढला आहे. गेमिंग, नॉन-फंक्शनल टोकन (एनएफटी) आणि डीएफआय (DeFi डीसेंट्रलाइज्ड फायनान्स) यांनी त्यात खरेदी करण्यास सुरवात केली आहे. मार्चमध्ये, कोईनबेसने वापरकर्त्यांना पॉलिगॉन डॉट कॉममध्ये व्यापार करण्यास परवानगी दिली. (कॉईनबेस अमेरिकन स्टॉक मार्केट नॅस्डॅक वर सूचीबद्ध कंपनी आहे.)

इथीरियमसोबत व्यापार

पॉलिगॉन कंपनीचे सह-संस्थापक संदीप नईवाल यांनी सांगीतले की पॉलिगॉन मध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. जसे इतर क्रिप्टोकरन्सीबद्दल संशय व्यक्त केला जातो त्याच पध्दतीने पॉलिगॉन बद्दलही काही गोष्टी आहेत. कंपनीने आपली व्याप्ती वाढविली आहे पॉलिगॉन चे इतर संस्थापक म्हणजे जयंती कानानी आणि अनुराग अर्जुन हे आहेत. पॉलिगॉन ब्लॉकचेन इथेरियमशी संबंधित आहे. यावर्षी जानेवारी ते मे या काळात पॉलिगॉनचा वापर 400 पट वाढला आहे.

हेही वाचा: '2022 वर्षाच्या अखेरीस बीटकॉईनच्या किंमती विक्रमी वाढणार', Bitcoin चं भारतातील भविष्य काय?

जगातील तिसरे स्थान मिळविण्याची तयारी

सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी अलीकडेच एनएफटीशी संबंधित आपल्या ट्विटमध्ये पॉलिगॉन च्या एका अॅप्लिकेशनचा वापर केला. पॉलीगॉनचे संस्थापक म्हणतात की भारतातील हे चलन जगात ब्लॉकचेनचे पॉवरहाऊस बनवावे लागेल. पॉलिगॉनची तजगभरातील सर्व डिजीटल चलनांना मागे टाकण्याच्या तयारीत आहे. कंपनीने म्हटले आहे की लवकरच बिटकॉइन आणि इथेरियम नंतर पॉलिगॉन तिसऱ्या स्थानावर येईल.

क्रिप्टोकरन्सीमध्ये भारत का मागे आहे

एप्रिलमध्ये पॉलिगॉनने एनएक्सटी, डेफी आणि इंश्योरंसशी जोडले जाण्यासाठी इन्फोसिस लिमिटेडबरोबर भागीदारी केली. अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये ज्या पद्धतीने क्रिप्टोकरन्सी विकसित झाली आहे त्यानुसार भारत अजूनही खूप मागे आहे, परंतु काम वेगाने सुरू आहे. पाश्चात्य देशांच्या क्रिप्टोकर्न्सी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. भारतातील उद्योगांनी खूप उशीरा या क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली आहे. जर भारतीय क्रिप्टोला जगात आपले स्थान बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. 2019 मध्ये पॉलिगॉनचे टोकन जगात बिनेंसद्वारे वितरीत केली गेले . ही कंपनी स्टार्टअप म्हणून सुरू करण्यात आली होती. यावेळी कंपनीने 50 दशलक्ष डॉलर्सची भांडवल उभे केले होते. भारतातील नियमांमुळे ब्लॉकचेन उद्योगात स्थान मिळविण्यात या कंपनीला समस्या आल्या. क्रिप्टोकरन्सींवर अजूनही बंदी आहे, यामुळे भारतातील गुंतवणूकदारांमध्ये खरेदी-विक्रीवर पुर्णपणे विश्वास ठेवला जात नाही. जगातील तज्ञ भारताला क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याचा सल्ला देत आहेत, पण त्यासाठी किती काळ लागेल, याबद्दल अद्याप काहीही सांगता येत नाही.

(india made cryptocurrency polygon is now among-worlds top 20 crypto coins)

हेही वाचा: एलॉन मस्क यांच्या एका ट्विटने बिटकॉईन क्रॅश; किंमत घसरली

loading image