नोकरी सोडल्यानंतर स्वत:च अपडेट करा PF अकाउंट; सहज फंड मिळवण्याचे हे आहेत उपाय

PF
PF

नवी दिल्ली : नोकरी बदलल्यानंतर अथवा नोकरी सोडल्यानंतर पीएफचे अकाउंटदेखील बदलावं लागतं. यामध्ये उशीर अथवा गडबड झाल्यावर अनेकदा फंड अडकून पडतो. त्यामुळे Employees' Provident Fund Organisation ने पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत आपण स्वत:च कंपनीची नोकरी सोडल्याची माहिती पोर्टलवर नोंदवू शकता. आतापर्यंत फक्त नोकरी देणाऱ्यांच्याच हाताता कर्मचाऱ्याच्या कंपनी जॉइन करण्याची आणि सोडण्याची तारीख EPFO च्या सिस्टिममध्ये टाकण्याचा अथवा अपडेट करण्याचा अधिकार होता. 

जर एखाद्या कारणामुळे कंपनीकडून कर्माचाऱ्याची नोकरी सोडल्याची तारीख अपडेट झाली नाही तर EPF वरुन फंड काढणे अथवा ट्रान्सफर करणे अवघड होऊन बसतं. आता पीएफ अकाउंट होल्डर्स स्वत:च EPFO च्या सिस्टीममध्ये डेट ऑफ इक्झिट अपडेट करु शकतात. हे काम ऑनलाईन होतं आणि हे करणं देखील सोपं आहे. आपण देखील याच पद्धतीने सिस्टीममध्ये डेट ऑफ एक्झिट अपडेट करु शकता.

  • सर्वांत आधी मोबाइल अथवा कम्प्यूटरवर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ उघडा. त्यानंतर UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगइन करा. आपला UAN ऍक्टीव्ह असला पाहिजे इतकी खबरदारी घ्या. 
  • आता नव्या उघडलेल्या पेजच्या वरती 'मॅनेज' टॅबवर क्लिक करा. यानंतर 'मार्क एक्झिट' हा पर्याय निवडा. यानंतर आपल्या समोर 'सिलेक्ट एम्प्लॉयमेंट' असा ड्रॉपडाऊन उघडेल. 
  • ड्रॉपडाऊनमध्ये जुनी PF अकाउंटची संख्या निवडा. हे UAN शी निगडीत असायला हवे. आपल्या स्क्रीनवर त्या PF अकाउंट आणि नोकरी सोडण्याचे सर्व डिटेल्स दिसून येतील. आता आपल्याला नोकरी सोडण्याचे तारीख आणि कारण टाकावे लागेल. नोकरी सोडण्याच्या कारणांमध्ये रिटायरमेंट, शॉर्ट सर्व्हिससारखे पर्याय उपलब्ध असतील.   
  • तुमचा योग्य पर्याय निवडून रिक्वेस्ट OTP या पर्यायावर क्लिक करा. OTP आपल्या आधार कार्डाशी लिंक झालेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. OTP ला निर्धारित वेळेत टाकून रिक्वेस्ट सबमिट करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोकरी सोडण्याची तारीख PF खात्यामध्ये नोंद झाल्याचा मॅसेज स्क्रीनवर येईल. 

अलिकडेच नोकरी सोडली असेल तर डेट ऑफ एक्झिट 2 महिन्यांच्या नंतर होईल
EPFO सिस्टीममध्ये डेट ऑफ एक्झिट अपडेट झाल्यानंतर त्याला बदलता येत नाही. हेही ध्यानात घ्या की, जर नोकरी अलिकडेच सोडली असेल तर डेट ऑफ एक्झिट अपडेट करण्यासाठी आपल्याला 2 महिने वाट पहावी लागेल. याचं कारण आहे की, डेट ऑफ एक्झिट मेंबर एम्प्लॉयीच्या PF मध्ये एम्प्लॉयरच्या वतीने शेवटचे कॉन्ट्रीब्यूशन केल्यानंतर 2 महिन्यांनी अपडेट केलं जाऊ शकतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com