गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

मेहनत करून कमावलेले पैसा वाचवायला हवा, त्याचबरोबर तो वाढवायलाही हवा. संपत्ती निर्मिती ही आयुष्यातील महत्त्वाची बाब आहे. परंतु संपत्ती ही फक्त उच्च दर्जाचे आयुष्य जगण्यासाठीच आवश्यक नसते तर वाढत जाणाऱ्या गरजा, महागाई आणि भविष्यातील आपली आर्थिक उद्दिष्टे किंवा गरजा यांच्यासाठीदेखील संपत्ती निर्मिती ही महत्त्वाची गोष्ट होऊन बसते. मात्र फक्त मेहनत करून आणि बचत करून संपत्ती निर्माण होत नाही. हे तर आवश्यक आहेच परंतु त्याचबरोबर धनवृद्धीसाठी योग्य गुंतवणूक ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे जितकी शक्य होईल तितकी बचत करत गुंतवणूक करत राहिले पाहिजे.

गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. योग्य ते आर्थिक नियोजन करून त्याची शिस्तबद्ध आणि नियमित अंमलबजावणी केल्यास अपेक्षित धनवृद्धी होऊ शकते. हे सर्व करताना काही महत्त्वाची सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे.

१. संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आपण केलेल्या गुंतवणूकीतून मोठी रक्कम उभी राहण्यास काही कालावधी लागतो. त्यासाठी संयम ठेवण्याची आवश्यकता असते. चटकन श्रीमंत होण्याची अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे फायदा तर होणार नाहीच परंतु एखाद्या संकटात सापडण्याचीच शक्यता अधिक असते.

२. मोठी रक्कम उभी करण्यास कालावधीही अधिक लागतो. त्यामुळेच जितक्या लवकर गुंतवणुकीची सुरूवात करू शकाल तितक्या लवकर सुरू करा. त्यामुळे तुमच्या गुंतवणूकीवर अधिक लाभ मिळवता येईल. विशीत सुरू केलेली गुंतवणूक तिशीतील गुंतवणूकीपेक्षा अधिक संपत्ती निर्माण करते. कारण लवकर गुंतवणूक सुरू केल्यामुळे जास्त कालावधी मिळतो आणि बचतही अधिक केली जाते पर्यायाने गुंतवणूकीची रक्कमही अधिक असते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

३. नियमितपणे गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा पाया आहे. शिस्तबद्धपणे वर्षानुवर्षे केलेली नियमित गुंतवणूक तुमचे संपत्ती निर्मितीचे स्वप्न पूर्ण करते. नियमितपणे गुंतवणूक केल्यास थोड्या रकमेच्या गुंतवणुकीचा लाभही मोठा असतो. उदा. १,००० रुपये ३० वर्षांसाठी गुंतवल्यास आणि त्यावर १० % परतावा मिळाल्यास मिळणारी रक्कम २२ लाखांपर्यत पोचू शकते. थोडक्‍यात लहान रक्कम दीर्घ काळ नियमितपणे गुंतवल्यास फायदा निश्‍चित आहे.

४. एसआयपीसारख्या चक्रवाढ व्याजाचा लाभ देणाऱ्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम उभी राहते. ३०व्या वर्षी एक लाख रुपये गुंतवले तर ६० व्या वर्षी (१० टक्के परतावा गृहीत धरून) साधारण १७.४५ लाख होतात तर५०व्या वर्षी ५ लाख रुपये त्याच दराने गुंतवल्यास ६०व्या वर्षी जवळपास फक्त १३ लाख होतात.

५. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना आपले वय, उत्पन्न , जोखीम क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घ्या. निश्चित उत्पन्न योजना उदा. बॅंक एफडी किंवा एनसीडी, पोस्टाच्या योजना, सोने, म्युच्युअल फंड, शेअर, रिअल इस्टेट हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध गुंतवणुकीचे पर्याय आहेत. यासाठी करबचतीचे नियोजनही करायला हवे. आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारांमधील गुंतवणूकीचे प्रमाण ठरवावे. मात्र विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करावी. एकाच किंवा ठराविकच गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

६. तरुण वयात जोखीम क्षमता अधिक असते त्यामुळे इक्विटी प्रकारात अधिक गुंतवणूक करावी. कारण त्यात परतावाही अधिक असतो. तर वय वाढल्यावर जोखीम क्षमता कमी होते, त्यामुळे सुरक्षित आणि तुलनेने कमी परतावा योजनांवर भर द्यावा.  हे सर्व करताना आपण लक्षात ठेवले पाहिजे की आर्थिक संपन्नतेसाठी गुंतवणूक आवश्यक आहे. म्हणूनच गुंतवणूक करणे जोखमीचे (जास्त परतावा देणारे पर्याय) तर असतेच परंतु गुंतवणूकच न करणे हे जास्त जोखमीचे असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com