esakal | कोरोनामुळे जागतिक महामंदीनंतरचे सर्वात मोठे, ८.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान : संयुक्त राष्ट्रसंघांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे जागतिक महामंदीनंतरचे सर्वात मोठे, ८.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान : संयुक्त राष्ट्रसंघांचा इशारा

जर सर्व देशांनी एकजुटीने आणि सदभावनेने ही परिस्थिती हाताळली नाही तर हे जागतिक महामंदीनंतरचे सर्वात मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत, असा धोक्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ यांनी दिला आहे.

कोरोनामुळे जागतिक महामंदीनंतरचे सर्वात मोठे, ८.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान : संयुक्त राष्ट्रसंघांचा इशारा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोविड-१९ महामारीमुळे कल्पनेपलीकडचा विध्वंस होण्याची शक्यता आहे. उपासमार आणि इतर अभूतपूर्व संकटं यामुळे निर्माण होणार आहेत. कोविड-१९मुळे जगभर लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा विपरित परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो आहे. कोविड-१९ मुळे जगाचे ८.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर सर्व देशांनी एकजुटीने आणि सदभावनेने ही परिस्थिती हाताळली नाही तर हे जागतिक महामंदीनंतरचे सर्वात मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत, असा धोक्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ यांनी दिला आहे.

कोविड-१९ ने आपली क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अलीकडच्या दशकांमध्ये आपण केलेल्या सर्व तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीनंतरसुद्धा आपण मानवी इतिहासातील अभूतपूर्व संकटाला सामोरे जात आहोत, असे मत संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अंटेनियो गुटेरस यांनी व्यक्त केले आहे. सर्व देशांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याचे महत्त्व त्यांनी मांडले आहे.

सेन्सेक्स 32,000 वर कायम; निर्देशांक निफ्टीमध्ये ९०अंशांची वाढ

* सर्व देशांनी एकजुटीने आणि सदभावनेने ही परिस्थिती हाताळली नाही तर हे जागतिक महामंदीनंतरचे सर्वात मोठे नुकसान होण्याची चिन्हे
* कोविड-१९ मुळे जगाचे ८.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता
*कोविड-१९ महामारीमुळे कल्पनेपलीकडचा विध्वंस होण्याची शक्यता 
* आपण केलेल्या सर्व तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीनंतरसुद्धा आपल्यासमोर मानवी इतिहासातील अभूतपूर्व संकट 
* या संकटाने सहा कोटी लोकांना दारिद्र्यात ढकलले
* जगातील जवळपास निम्मे मनुष्यबळ बेरोजगार होण्याची शक्यता
* मात्र त्याचबरोबर सुरक्षित आणि समृद्ध जग नव्याने निर्माण करण्याचीही संधी

केपजेमिनीचे ''थिएरी डेलापोर्टे'' विप्रोच्या सीईओ आणि एमडीपदावर

जर आपण आताच योग्य पावले उचलली नाहीत तर संपूर्ण जगात कल्पनेपलीकडील नुकसान होईल. प्रचंड उपासमार होण्याची शक्यता आहे. या संकटामुळे सहा कोटी लोकांना दारिद्र्यात ढकलेले आहे. जगातील  १.६ अब्ज लोकांपैकी जवळपास निम्मे मनुष्यबळ बेरोजगार होण्याची शक्यता आहे, असे मत पुढे अंटेनियो गुटेरस यांनी व्यक्त केले आहे. 

१९३० मध्ये आलेल्या जागतिक महामंदीनंतरचे जगाचे सर्वात मोठे नुकसान या कोविड-१९ महामारीमुळे होण्याची शक्यता आहे. हे नुकसान ८.५ ट्रिलियन डॉलर इतके असू शकेल. जागतिक आरोग्य व्यवस्था, प्रंचड मोठी विषमता यासारख्या प्रचंड मोठ्या संकटाचा सामना जगाला करावा लागणार आहे. आपल्या क्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानवी अस्तित्वासंदर्भात निर्माण झालेल्या या संकटाचा सामना आपण मानवतेने, एकजुटीने आणि सदभावनेने करण्याची आवश्यकता आहे, असे अंटेनियो गुटेरस म्हणाले आहेत.

गुगल करणार व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक?; आयडियाकडून वृत्ताचे खंडन

विविध देशांमधील रोजगार आणि व्यवसाय हे त्या देशांमधील आरोग्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचे स्थैर्य यावर अवलंबून असतात. कोरोनामुळे आधुनिक काळातील अभूतपूर्व संकट आपल्यासमोर निर्माण केले आहे. मात्र त्याचबरोबर सुरक्षित आणि समृद्ध जग नव्याने निर्माण करण्याचीही संधी आहे, असेही पुढे अंटेनियो गुटेरस म्हणाले.