चंदा कोचर यांच्याकडून वसुलीसाठी बॅंकेचा खटला

टीम ई-सकाळ
मंगळवार, 14 जानेवारी 2020

चंदा कोचर यांनीदेखील आयसीआयसीआय बॅंकेवर खटला दाखल केला आहे.

मुंबई : आयसीआयसीआय बॅंकेने चंदा कोचर यांच्यावर खटला दाखल केला आहे. चंदा कोचर यांच्याकडून 12 कोटी रुपयांची वसूली करण्यासाठी बॅंकेने हा खटला दाखल केला आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. चंदा कोचर यांनी बॅंकेतील पदाचा राजीनामा देण्यापू्र्वी सेवेत असताना बोनस आणि इतर लाभांच्या रुपात बॅंकेकडून 12 कोटी रुपयांचा लाभ घेतला होता. कोचर यांचे वकील विक्रम नानकानी यांनी बॅंकेने दिवाणी खटला दाखल केल्याची माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जर बॅंकेच्या विश्वासार्हतेला धक्का लागण्यासंदर्भातील कृत्य चंदा कोचर यांच्याकडून झाले असल्यास बॅंकेने बोनस आणि इतर सुविधांसाठी चंदा कोचर यांना दिलेली रक्कम परत घ्यावी यासाठी कोचर यांनीही सहमती दर्शवल्याचे बॅंकेचे म्हणणे आहे. 10 जानेवारीला अभिजित जोशी यांच्या व्हेरिटाज लिगल या कायदेविषयक कंपनीकडून हा दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे. याआधी चंदा कोचर यांनीदेखील आयसीआयसीआय बॅंकेवर खटला दाखल केला आहे.

अर्थविश्वच्या बातम्या वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

चंदा कोचर यांची वेळेआधीच निवृत्त होण्याची विनंती मान्य केल्यानंतरही बॅंकेने त्यांना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बॅंकेवर खटला दाखल केला आहे. चंदा कोचर यांची व्हिडिओकॉन समूहाला नियमबाह्यरित्या 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icici bank asks recovery amount from chanda kochhar