आयडीबीआयमध्ये 445 कोटींचा गैरव्यवहार 

पीटीआय
शनिवार, 24 मार्च 2018

किसान क्रेडिट कार्ड आणि मत्स्यशेतीचे कर्ज बनावट कागदपत्रांद्वारे मिळवून आयडीबीआय बॅंकेची 445.32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅंकेच्या माजी सरव्यवस्थापकासह 31 जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. 

नवी दिल्ली : किसान क्रेडिट कार्ड आणि मत्स्यशेतीचे कर्ज बनावट कागदपत्रांद्वारे मिळवून आयडीबीआय बॅंकेची 445.32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅंकेच्या माजी सरव्यवस्थापकासह 31 जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. 

बॅंकेचे माजी सरव्यवस्थापक बट्टू रामा राव यांच्याशी संगनमत करून 220 कर्जदारांच्या 21 गटांनी बॅंकेकडून 2009-10, 2010-11 आणि 2011-12 या वर्षांमध्ये 192.98 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे कर्ज घेण्यात आले होते आणि कर्जासाठी हमी म्हणून देण्यात आलेल्या मालमत्तेचे मूल्यही अधिक दाखविण्यात आले होते. हे कर्ज नंतर थकीत कर्जामध्ये रुपांतरित झाले. या 220 कर्जदारांवरील एकूण कर्ज 30 सप्टेंबर 2017 रोजी 445.32 कोटी रुपयांवर पोचले. 

राव हे बॅंकेच्या बशीरबाग येथील शाखेत नियुक्त होते, त्या वेळी हा कर्जगैरव्यवहार घडला. कर्जाच्या रकमेचा कर्जदारांनी दुसऱ्याच कारणासाठी वापर केला. कर्जाची रक्कम त्यांनी प्रत्येक कर्जदाराच्या बचत खात्यात वर्ग केली. नंतर प्रत्येकाने वेगवेगळ्या कारणांसाठी ती वापरली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IDBI Bank GM in Rs 445.32 crore cheating case