IDEA-Vodafone प्रीपेड रिचार्ज महागणार? वाचा नवे दर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vodafone Idea to be merged

IDEA-Vodafone प्रीपेड रिचार्ज महागणार, वाचा नवे दर!

दूरसंचार कंपन्यांमध्ये कमालीची स्पर्धा वाढली आहे, या कंपन्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी बाजारात सतत नवीन आणि स्वस्त प्लॅन ऑफर करत असतात. मात्र, कोरोना थंड होत असताना दुरसंचार कंपन्यांनी दर वाढवायला सुरुवात केली आहे.

भारतात एअरटेलनंतर, दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख वोडाफोन आयडियाने देखील त्यांच्या मोबाइल सेवांचे दर वाढवले ​​आहेत. कंपनीने यासंर्भात अधिकृत निवेदन जारी केलं आहे. नव्या रेट्सनुसार 79 रुपयांचा सर्वात कमी प्लॅन 25 नोव्हेंबरपासून 99 रुपये असेल. तो 28 दिवसांचा आहे.

 फोटो सौजन्य - टाइम्स ग्रुप

फोटो सौजन्य - टाइम्स ग्रुप

नवीन टॅरिफ योजना सर्व प्रीपेड वापरकर्त्यांसाठी असून 25 नोव्हेंबरपासून त्या लागू होतील. 'ARPU च्या सुधारणेची लवकरच प्रक्रिया सुरू होणार असून उद्योगाला भेडसावणाऱ्या आर्थिक ताणाला तोंड देण्यास मदत करतील,' असं त्यात म्हटलं आहे.

एअरटेलने प्री-पेड दरांमध्ये सुमारे 25 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी हे पाऊल उचलल्याचं समोर आलंय.

Airtel च्या पावलावर पाऊल!

एअरटेलने नुकतेच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवण्याची घोषणा करत युजर्सना मोठा झटका दिला आहे. Airtel ने एकाच वेळी त्यांच्या 15 प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने त्यांच्या (Airtel Plan Price Hiked) या प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या नवीन किमती २६ नोव्हेंबरपासून लागू होतील.

एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या टॅरिफ दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. या नवीन किंमत 26 नोव्हेंबरपासून लागू होतील. म्हणजेच 26 नोव्हेंबरपासून तुम्हाला Airtel चा प्रीपेड प्लॅन खरेदी करण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. रिपोर्टनुसार, कंपनीने 15 प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. तर येत्या काळात व्होडाफोन आणि जिओ देखील त्यांचे प्लॅन महाग करू शकतात, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या खिशाला अणखीनच झळ बसणार आहे.

loading image
go to top