
गॅस कनेक्शन घेतल्यानंतरही अनेकांना आजही त्याच्या फायद्यांबाबत माहिती नाही. याच अज्ञानाचा फायदा काही लोक घेतात. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे नियम सांगणार आहोत.
नवी दिल्ली- गॅस सिलिंडरचा वापर जवळपास सर्वच घरात होतो. परंतु, गॅस कनेक्शन घेतल्यानंतरही अनेकांना आजही त्याच्या फायद्यांबाबत माहिती नाही. याच अज्ञानाचा फायदा काही लोक घेतात. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे नियम सांगणार आहोत. यामुळे तुम्ही दक्ष तर राहाल त्याचबरोबर तुमचा आर्थिक फायदाही होईल.
जर तुम्ही सिलिंडरची घरी डिलिव्हरी न घेता स्वतः गोडावूनमधून घेतला तर तुम्ही त्या एजन्सीकडून 19 रुपये 50 पैसे परत घेऊ शकता. कोणतीही गॅस एजन्सी ही रक्कम देण्यास नकार देऊ शकत नाही. ही रक्कम डिलिव्हरी चार्ज म्हणून सिलिंडर बुकिंग करतानाच तुमच्याकडून घेतलेली असते. सर्व कंपन्यांना सिलिंडरची ही रक्कम ठरलेली आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी ही रक्कम वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला डिलिव्हरी चार्ज 15 रुपये घेतले जात. आता ती रक्कम वाढवून 19.50 पैसे करण्यात आली आहे.
हेही वाचा- विना मास्क सेल्फी घेणं राष्ट्राध्यक्षांना पडलं महागात, अडीच लाखांचा दंड
कोणताही एजन्सी चालक ही रक्कम नाकारु शकत नाही. परंतु, जर एखाद्याने पैसे देण्यास नकार दिला तर तुम्ही 18002333555 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता. दरम्यान, ग्राहकांना अजूनही वर्षभरात सबसिडीचे 12 सिलिंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर बाजारातील दराने सिलिंडर खरेदी करावे लागतात.
जर तुमच्या सिलिंडरचा रेग्युलेटर लीक झाला असेल तर तुम्ही ते फ्रीमध्ये एजन्सीकडून बदलून घेऊ शकता. त्यासाठी जवळच्या एजन्सीचे सबस्क्रिप्शन व्हाऊचर गरजेचे आहे. तुम्हाला तो रेग्युलेटर आपल्याबरोबर एजन्सीकडे न्यावा लागेल. सब्स्क्रिप्शन व्हाऊचर आणि रेग्युलेटरचा नंबर जुळतो का हे पाहिले जाईल आणि दोन्ही नंबर एकच असल्यास तुम्हाला रेग्युलेटर बदलून दिला जाईल. त्यासाठी तुम्हाला कोणतेच शूल्क द्यावे लागणार नाही.
हेही वाचा- झाले गेले विसरा पक्षासाठी एकत्र या; सोनियांनी घातली भावनिक साद
जर तुमचा गॅस रेग्युलेटर एखाद्या कारणामुळे खराब झाला असेल तर गॅस एजन्सी तोही बदलून देते. परंतु, यासाठी एजन्सी कंपनीच्या टेरिफप्रमाणे तुमच्याकडून ठराविक रक्कम जमा करुन घेते. ही रक्कम 150 रुपयांपर्यंत असू शकते.
जर तुमचा रेग्युलेटर चोरीला गेला आणि तुम्हाला एजन्सीकडून नवीन रेग्युलेटर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पोलिसांत एफआयआर दाखल करावा लागेल. एफआयआरची पत जमा केल्यानंतर एजन्सी तुम्हाला रेग्युलेटर बदलून देईल.
रेग्युलेटर हरवला तर तुम्हाला 250 रुपये जमा करुन एजन्सीकडून नवीन रेग्युलेटर घेता येईल. ग्राहकांच्या सुविधेसाठी आता मल्टिफंक्शनल रेग्युलेटरही बाजारात आले आहेत. हे रेग्युलेटर टाकीत गॅस किती राहिला आहे, हेही सांगतात. रेग्युलेटरची लाइफटाइम वॉरंटी असते. मात्र, उत्पादनासंबंधी समस्या असेल तरच रेग्युलेटर फ्रीमध्ये बदलून दिले जातात. इतरवेळेस शूल्क घेतले जातात.