TAX sakal.jpg
TAX sakal.jpg

इनकम टॅक्स रिटर्न भरताय; मग नक्कीच बातमी वाचा  

यंदाच्या आर्थिक वर्षातील इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर जवळ येत आहे. व बहुतेक लोकांनी आपला रिटर्न टॅक्स भरला आहे. मात्र ज्यांनी आतापर्यंत आपला टॅक्स भरलेला नाही व ते भरण्याच्या तयारीत आहेत ते आपला टॅक्स लवकरात लवकर जमा करू शकतात. परंतु इनकम टॅक्स रिटर्न भरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेकरून जे पहिल्यांदा टॅक्स भरणार आहेत त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच महत्वाची आहे. कारण थोडीशी चूक झाल्यामुळे आयटीआर अर्ज नाकारला जाऊ शकतो.

इनकम टॅक्स रिटर्न भरताना काही चूक झाल्यास दंडासह नोटीस देखील येऊ शकते. कारण इनकम टॅक्स विभाग कर्मचाऱ्याच्या कंपनीकडून देण्यात आलेला फॉर्म 16 आणि फॉर्म -26 एएस च्या माध्यमातून मिळालेली माहिती पडताळणी करते. त्यामुळे ई-फाइलिंग करताना नाव, पत्ता, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाइल नंबर अचूक भरणे महत्वाचे आहे. याशिवाय अचूक बँक खात्याची माहिती देणे आवश्यक आहे. बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी आणि एमआयसीआर कोड पुन्हा पुन्हा तपासा. योग्य माहिती दिल्यास इनकम टॅक्सचा रिफंड मिळण्यात अडचणी येणार नाहीत. 

याच्याव्यतिरिक्त, सर्व बँक खात्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. प्राप्तिकर विभागाच्या कायद्यानुसार टॅक्स भरणाऱ्यांना त्याच्या नावे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या बँक खात्यांची माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे इनकम टॅक्स भरताना आपल्या सर्व बँक खात्यांची माहिती नीट भरा. तसेच इनकम टक्स रिटर्न भरताना आपल्या 26 एएस फॉर्ममधील उत्पन्नाविषयी दिलेला टीडीएस डेटाच इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म मध्ये भरणे गरजेचे आहे. जर यातील आकडे जुळत नसल्यास इनकम टॅक्स विभागाकडून आपला अर्ज रद्द केला जाऊ शकतो.    

तसेच इतर माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळत असल्यास त्याची माहिती देखील देणे गरजेचे आहे. ही माहिती लपवल्यास तो गुन्हा आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्नची प्रक्रिया झाल्यानंतर त्याचे ई व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. व इनकम टॅक्सची स्थिती तपासण्यासाठी या incometaxindiaefiling.gov.in वेबसाईटला भेट देऊ शकता.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com