esakal | 'वर्क फ्रॉम होम' करत असाल तर जास्तीचा कर देण्याची तयारी ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

Tax, WorkFromHOME

सध्या कोरोनाच्या संकटामुळे भारतातील बऱ्याच कंपन्या बंद आहेत. याकाळात ज्या कंपन्या सुरू आहेत त्यांचे कर्मचारी घरुनच काम करत (work from home) आहेत.  

'वर्क फ्रॉम होम' करत असाल तर जास्तीचा कर देण्याची तयारी ठेवा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

सध्या कोरोनाने संपुर्ण जग थांबवलं आहे. कोरोनाकाळात सरकारला येणारं उत्पन्नही कमी झालं आहे. सध्याच्या घडीला भारतीय अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत आहे. त्यामुळे आता उत्पन्न मिळवण्यासाठी सरकार काही नवीन उपायोजना करण्याच्या तयारीत दिसत आहे. अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारला मिळणारा कर कसा वाढेल, यावर लक्ष दिलं जाऊ शकतं, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मॉरिशसमध्ये तेल गळतीने पर्यावरणाची अपरिमित हानी; इतके महत्त्व का?

सध्या कोरोनाच्या संकटामुळे भारतातील बऱ्याच कंपन्या बंद आहेत. याकाळात ज्या कंपन्या सुरू आहेत त्यांचे कर्मचारी घरुनच काम करत (work from home) आहेत.  अशा परिस्थितीत वाहन भत्ता (Conveyance allowance) यापुढे करमुक्त राहणार नाही असं दिसतंय. कारण याकाळात कर्मचारी घरून काम करत असल्याने त्यांचा प्रवासच होत नाहीये.  जेव्हा 'वाहक भत्ता' रीइंबर्समेंट (reimbursement) म्हणून दिला जातो तेव्हा तो प्रत्यक्षात खर्च झाल्यास तो पूर्णपणे करमुक्त असतो. तसेच कर्मचाऱ्यांना सुट्टीचा प्रवास भत्ता (LTA- Leave travel allowance) करमुक्तीबाबतचा  दावा देखील दाखल करता येणार नाही. जो कर्मचाऱ्यांना 4 वर्षात दोनदा मिळत असतो सध्याच्या कोरोनाकाळात  कंपनीचे कर्मचारी अधिकृतपणे कुठेही जाऊ शकले नाही तर आता हे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या (taxable income) खाली येऊ शकते. 

वॉल स्ट्रिट जर्नलच्या रिपोर्टवरुन भाजप-काँग्रेस समोरासमोर

त्याचप्रमाणे, आपण कोरोना कालावधीत भाड्याचे घर सोडले असेल आणि आपल्या कुटूंबासह सध्या गावकडील घरात किंवा आपल्या कायमच्या घरी गेले असाल तर घरभाडे भत्त्यावर (HRA- House Rent Allowance ) तुम्हाला करात सूट मिळणार नाही.  तुम्हाला इथून पूढे 'एचआरए' वरही कर भरावा लागू शकतो.  कर व नियामक सेवा पुरवणाऱ्या BDOIndia चे भागीदार प्रकाश कोटाडिया म्हणतात, 'जर एखाद्या कर्मचाऱ्याने आपले भाड्याचे घर रिक्त केले असेल तर त्यांच्या पगारातील एचआरए ​​करपात्र असेल.

'वर्क फ्रॉम होम' च्या भत्त्यावरही द्यावा लागेल कर- 

एखादी कंपनी तुम्हाला पुराव्याशिवाय  work from home च्या कालावधीत भत्ता देत असेल तर तुम्हाला यासंदर्भातील खर्चाचा तपशील ठेवावा लागणार आहे. सरकारकडून नियमात बदल झाला तर तुम्हाला आयकर विभागाला खर्चाचा तपशील देणं  बंधनकारकही होऊ शकतं. या परिस्थितीत तुमच्यावर वर्क फ्रॉम होमच्या भत्त्यावर कर भरण्याची वेळही येऊ शकते.