नव्या वर्षात मोठी बचत करायची आहे? मग हे माहिती करून घ्याच

If you want to save large amount of money in this year then read this article
If you want to save large amount of money in this year then read this article

भारतात उत्पन्नावरील प्राप्तीकराचे नियोजन करणे अतिशय प्राधान्याचेच मानले पाहिजे. यासाठी व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून कर बचतीद्वारे गुंतवणूक करणे शक्य आहे. याखेरीज प्राप्तीकर कायद्यातील विविध कलमाअंतर्गत असलेल्या सवलतींची माहिती घेऊन त्यातील करदात्यास करभार कमी करण्यासाठी कोणत्या सवलती उपयुक्त ठरतात याचा अभ्यास करणे ही गरज आहे व त्याप्रमाणे पैशाचा विनियोग करून करदात्याचा एकूण करभार कमी करणे म्हणजेच कर नियोजन होय. असे नियोजन असल्यास करदात्यास भावी आर्थिक वर्षातील देय कर आकलनासाठी व उत्पन्नातून वजावटी मिळण्यासाठी किती अर्थार्जनाची गरज आहे याची माहिती समजते व किती गुंतवणूक वा खर्च केल्यास करदात्यास किमान प्राप्तिकर द्यावा लागेल याची पूर्व कल्पना येते. उद्दिष्ट माहित असल्यास त्या बरहुकूम पैशाची व्यवस्था करून कर नियोजन आर्थिकदृष्ट्या करता येऊ शकते.

यंदाचे आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास तीन महिन्याचा कालावधी बाकी आहे व यंदाच्या वर्षी कर बचत करण्यासाठी येत्या तीन महिन्यात घ्यायची खबरदारी नीट पार पाडली तर कर बचत होईल व गुंतवणूक देखील होऊ शकते.

१. सर्वात पहिले कलम ८०सी अंतर्गत जर पीपीएफ खात्याद्वारे कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक होत असेल तर यंदाच्या वर्षाची या खात्यात पैसे भरण्याची तारीख जरी ३१ मार्च २०२० असली तरी मार्च महिन्याचे पूर्ण व्याज मिळण्यासाठी ५ मार्च २०२० अगोदर या खात्यात पैसे भरणे आवश्यक आहे. या तारखेनंतर जर पैसे भरले तर मार्च महिन्याचे व्याज मिळत नाही हे लक्षात घ्यायला हवे. अज्ञान पाल्य व पालक मिळून ही एकत्रित रक्कम दीड लाख रुपये आहे ही बाब पण लक्षात घेतली पाहिजे. 

२. जर स्वाथ्य विम्याचा हप्ता ३१ मार्च अगोदर भरायचा बाकी असेल तर तो रेखांकित धनादेशाद्वारेच भरल्यास उत्पन्नातून वजावटीस पात्र होतो हे महत्वाचे. रोख रक्कम भरल्यास ती विमा रक्कम उत्पन्नातून वजावटीस पात्र होत नाही लक्षात घेतले पाहिजे. करदाता प्रथमच स्वास्थ्य विमा काढणार असेल तर खासगी विमा कंपन्याऐवजी सरकारी कंपन्यांमध्ये विमा उतरविल्यास तुलनेने कमी हप्ता व पैसे मिळण्याची पूर्ण शाश्वती असते व किरकोळ कारणासाठी क्लेम नाकारला जात नाही. जर खासगी कंपन्यामध्ये स्वास्थ्य विमा उतरवायचाच असेल तर सदर कंपनीचा ‘क्लेम रीजेक्शन रेशो’ पाहूनच विमा उतरवावा जेणेकरून बिकट समयी सदर पैशाचा योग्य उपयोग करता येऊ  शकेल.

३. जर पुढील तीन महिन्यात कोणत्याही भारतात स्थायी  असणाऱ्या धर्मादायी संस्थेस रु दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची देणगी देणार असाल तर ती धनादेशा द्वारेच देणे आवश्यक आहे अन्यथा रोख स्वरूपात दिल्यास ती उत्पन्नातून वजावट मिळण्यास पात्र राहणार नाही. परदेशात असणाऱ्या धर्मादायी संस्थेस अशी देणगी चेकने दिल्यासही वजावटीस पात्र असत नाही. तसेच परदेशातून विदेशी नागरिकांकडून करदात्यास देणगी आल्यास गृह मंत्रालय भारत सरकारच्या पूर्व परवानगी शिवाय स्वीकारता येत नाही. धनादेश स्वीकारणे देखील गुन्हा मानल्या गेला आहे. परेदशी नागरिक असणाऱ्या पाल्याकडून वर्षाभरात एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम देशी/विदेशी चलनात पालकांना भेट म्हणून मिळाली असेल तर त्याची माहिती ३१ मार्च २०२० पर्यंत गृह मंत्रालयास कळविणे बंधनकारक मानले गेले आहे.

४. उत्पन्नातून वजावट मिळण्यासाठी कोणत्या व कधी उपयुक्त उपलब्ध पर्यायामध्ये गुंतवणूक करावी हे समजत नसल्यास मान्य बँकांमध्ये दीड लाख रुपयाची मुदत ठेव ३१ मार्च २०२० अगोदर ठेवावी. मात्र सदर ठेव ठेवताना ही प्राप्तीकर बचत करण्यसाठी कलम ८०सी अंतर्गत ठेव ठेवत आहे हे विषद करण्यास विसरू नका कारण फक्त टक्स सेव्हर मुदत ठेव सदर कलमा अंतर्गत उत्पन्नातून वजावटीस पात्र असते हे लक्षात घ्यायला हवे. ही ठेव उत्पन्नातून वजावट घेण्यासाठी प्रती वर्षी ठेवावी लागते हे ध्यानात असू द्या. एकदा ठेवलेली ठेव पुढील प्रत्येक वर्षी वापरता येत नाही याची जाण ठेवा.

५. करदात्याचे उत्पन्न करपात्र असेल किंवा व्याजाचे उत्पन्न किमान करमुक्त मर्यादेपेक्षा अधिक असेल तर उद्गम कर कपात होऊ नये म्हणून फॉर्म १५जी किंवा १५एच भरल्यास रु.दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. वर्षाच्या सुरुवातीला हे फॉर्म्स भरणे आवश्यक होते. तथापि हा फॉर्म पुढील तीन महिन्यात कधीही भरल्यास पुढील उद्गमकर कपात टाळू शकता. बँकेने कर कापला म्हणजे त्या उत्पन्नावर कर देण्याची आवश्यकता नाही असे बरेच करदाते समजतात म्हणून ते ही उत्पन्न विचारात घेऊन प्राप्तीकर भरणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना (व्यावसायिक सोडून) आगाऊ कर भरण्याची गरज नाही म्हणून त्यांनी देय कर विवरणपत्र भरताना भरला तरी चालतो. तथापि इतर व्यावसायिकांना आगाऊ कराचा अंतिम हप्ता १५ मार्च २०२० पर्यंत भरणे आवश्यक आहे तर ३१ मार्च पर्यंत सर्व उत्पन्नावर आगाऊ कर भरणे आवश्यक आहे. ३१ मार्च २०२० पूर्वी भरलेला सर्व प्राप्तीकर आगाऊ कर मानला जातो.

६. आपले आर्थिक वर्ष २०१८-१९ चे प्राप्तीकर विवरणपत्र भरायचे राहिले असल्यास ३१ मार्च २०२० पूर्वी जरूर भरा. जर करदात्याचे उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास रु. एक हजार तर उत्पन्न रु. पाच लाखांपेक्षा अधिक असल्यास रु. दहा हजार दंड भरून भरता येईल. ३१ मार्च नंतर हे विवरण पत्रक भरता येणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. करदात्याचे उत्पन्न करपात्र असताना असे विवरण पत्रक न भरल्यास व नंतर प्राप्तीकर विभागाने पुढील दहा वर्षात कधीही शोधून काढल्यास दंड व तुरुंगवास होऊ शकतो हे ध्यानात घेतले पाहिजे. एका पगारदार व्यक्तीस असे विवरण पत्र नोटीस देऊनही न भरल्या बद्दल सहा महिन्याची शिक्षा चेन्नई उच्च न्यायालयाने सुनाविली आहे हे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवे.

७. ज्या करदात्यांनी त्यांची जबाबदारी निभावत उद्गम कर कपात केली असल्यास त्याचा भरणा पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत न केल्यास व्याजासह सदर रक्कम भरावी लागेल. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेच्या आत पुढील तीन महिने उद्गमकर कपातीची रक्कम भरणे आवशयक आहे. याखेरीज ३१ डिसेम्बरला संपलेल्या तिमाहीचे उद्गमकर कपातीचे विवरणपत्रक ३१ जानेवारी २०२० पर्यंत भरणे तर ३१ मार्च २०२० चे विवरणपत्रक ३१ मे २०२० पर्यंत भरणे आवश्यक आहे. उशिर होणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी व प्रत्येक विवरणपत्रकासाठी रु. दोनशेचा दंड आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

८.जर करदाता डॉक्टर, इंजिनियर, वकील, सिये सारखा व्यावसायिक असेल व त्याचे वार्षिक ढोबळ जमा राशी ५० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर प्राप्तीकर विभागाने सदर करदात्यांना कलम ४४एडीए अंतर्गत गृहीत उत्पन्नाची घोषणा करण्याची संधी दिली आहे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन ढोबळ जमा राशीच्या पन्नास टक्के जमा रक्कमेवर कर भरावा. या कलमा अंतर्गत कोणतेही खर्च दाखवावे लागणार नसल्याने या गटातील सर्व व्यावसायिकांनी खर्च केला असो वा नसो वा दाखविला असो वा नसो याचा विचारच होणार नसल्याने या करदात्यांची बल्ले बल्ले होणार असल्याने या कलमाचा जरूर फायदा घ्यावा इतकी ही उत्तम तरतूद आहे.

९ मोठा धंदा करणाऱ्यानी कलम २६९ एसटी चा आदर न केल्यास आर्थिक आपत्ती ओढवू शकते याची कल्पना असणे आवश्यक आहे. या कलमांतर्गत धंदा करणाऱ्या वा इतर करदात्यांनी दोन लाख किंवा अधिक रक्कम रोख स्वरूपात घेण्यास कायद्याने मज्जाव केलेला आहे. जर चुकूनसुद्धा अशी रक्कम स्वीकारली तर रक्कम स्वीकारल्याच्या शंभर टक्के प्राप्तीकर लागणार आहे. याची जाणीव ठेवली पाहिजे. हा कर सदर रोख रक्कम देणाऱ्या करदात्यावर नसून घेणाऱ्या करदात्यावर आहे हे विक्रेत्याने किंवा इतर करदात्याने लक्षात ठेवायला हवे. हे कलम एका वेळी, किंवा एका दिवसात किंवा एका व्यवहारासाठी रु. दोन लाख किंवा अधिक रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्यास लागू शकतो हे ध्यानांत ठेवले पाहिजे अन्यथा करदाता स्वतः आर्थिक अरिष्ट ओढवून घेवू शकतो. उदाहरणार्थ एका व्यक्तीने दोन लाख रुपयांचे दागीने घेतले व त्याचा मोबदला सराफास पन्नास हजाराचे चार हप्ते करून रु. दोन लाख रोख स्वरूपात दिले असल्यास सराफ विक्रेता या कलमा अंतर्गत दोषी मानला जाईल व त्यास सदर रक्कम रोख स्वरुपात मोबदला म्हणून स्वीकारल्या बद्दल रु. दोन लाख प्राप्तिकर दंड भरावा लागेल.

१०. खरेदीदार व्यावसायिकास देखिल पूर्वी उदधृत केलेले नियम लागू आहेत. कोणतीही खरेदी किंवा खर्च करताना जर रक्कम दहा हजार किंवा अधिक असेल किंवा वीस हजारापेक्षा अधिक कर्ज किंवा ठेवी स्वीकारत असेल वा परतफेड करीत असेल तर सदर रक्कम धनादेशाद्वारेच घ्यायला व द्यायला हवी असे बंधन आहे. असे न केल्यास सदर खर्च मान्य होणार नाही तर कर्ज किंवा ठेवी स्वीकारल्यास कलम २६९एसएस व २६९टी अंतर्गत शंभर टक्के पर्यंत दंड होऊ शकतो

११. पगारदार व्यक्ती पाच वर्षात निवृत्त होणार असेल तर इतर कोठेही गुंतवणूक न करता स्वतच्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्यास कर बचती सह पैसे देखील निवृती नंतर ताबडतोब मिळू शकतील व गुंतवणुकीच्या बंदीस्त कालावधी अगोदर पैसे मिळू शकतील. जर पगारदार व्यक्ती आई वडिलांकडे राहत असेल व करदात्यास घरभाडे भत्ता मिळत असल्यास आई वडिलांना घर भाडे दिल्यास घरभाडे भत्त्यातून वजावट मिळू शकेल. तथापि सदर भाडे धनादेशाद्वारे द्यावे जेणेकरून पैसे दिल्याचे सिध्द होण्यास अडचण होणार नाही.

१२. काही विमा प्रतिनिधी विमा हफ्ता ३१ मार्च पर्यंत भरल्यास त्यावर एका वर्षाचा बोनस मिळतो असे सांगून त्यांचा विम्याचा व्यवसाय वृद्धी होण्यासाठी दिशाभूल करतात त्यावर विश्वास न ठेवता वर्षभरात कधीही हप्ता भरला तरी बोनस मिळतो हे ध्यानात घ्यावे व चूकीची गुंतवणूक होऊ देऊ नये कारण असा बोनस शेवटच्या वर्षात मिळत नाही हे सूत्र लक्षात ठेवायला हवे.

१३. ३१ मार्च २०२० अगोदर पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे घर कर्ज काढून देखील विकत घेत असाल तर बांधकाम व्यावसायिकाला पैसे देताना घराच्या किंमतीच्या एक टक्का रक्कम कापून घेऊन त्याच्या नावाने प्राप्तीकर खात्यात भरावी लागते व राहिलेली रक्कम त्याला द्यायची असते ही बाब लक्षात ठेवली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com