गुंतुवणुकदार मालामाल; सरलेल्या वर्षात शेअर बाजाराने दिला दोनअंकी परतावा

वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

  • शेअर बाजारात गुंतवणूकदार 11 लाख कोटींनी मालामाल
  • सरलेल्या वर्षात शेअर बाजाराने दिला दोनअंकी परतावा 

मुंबई : नवनवीन उच्चांक गाठणाऱ्या शेअर बाजाराने वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. वर्ष 2019 मध्ये  मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारभांडवल 11 लाख 05 हजार कोटींनी वधारून 155 लाख 53 हजार कोटींवर पोचले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वर्षातील अखेरच्या दिवशी मात्र नफावसुलीमुळे शेअर निर्देशांकाने गुंतवणूकदारांची निराशा केली. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 304 अंशांच्या घसरणीसह 41 हजार 253 अंशांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 87 अंशांची घसरण झाली. तो 12 हजार 168 पातळीवर व्यवहार करीत स्थिरावला. अखेर निराशाजनक राहिली असली, तरी सेन्सेक्‍सने सरलेल्या वर्षात 14.38 टक्के आणि निफ्टीने 12.02 टक्के परतावा दिला आहे.

बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय

शेअर बाजारात मंगळवारी सर्वच निर्देशांक घसरणीसह बंद आले. क्षेत्रीय पातळीवर बॅंका, दूरसंचार, ऑटो, एनर्जी आणि टेक कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी विक्री करून नफावसुली केल्याने बाजारात घसरण झाली. सेन्सेक्‍समधील प्रमुख 30 कंपन्यांपैकी एनटीपीसी, ओएनजीसी, सनफार्मा आणि पॉवरग्रीड वगळता 26 कंपन्यांचे शेअर नकारात्मक व्यवहार करीत बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, ऍक्‍सिस बॅंक, एसबीआय, इन्फोसिस, टायटन, एचयूएल, भारती एअरटेल, इंडसइंड, हिरोमोटो कॉर्प, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, टीसीएस, मारुती आणि बजाज फायनान्सच्या शेअर घसरणीसह बंद झाले. 

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

निफ्टी आणि सेन्सेक्‍सची कामगिरी : 

  1. सेन्सेक्‍समध्ये वर्षाच्या अखेरच्या दिवशी घसरण झाली असली, तरी सेन्सेक्‍सने वर्ष 2019 मध्ये 14.38 टक्के परतावा दिला आहे. सेन्सेक्‍सने वर्षभरात 41 हजार 809 अंशाची उच्चांकी, तर 35 हजार 287 अंशांची नीचांकी पातळी गाठली. वर्ष 2019 मध्ये सेन्सेक्‍समध्ये 5185 अंशांची भर पडली. 
     
  2. निफ्टीने वर्षभरात गुंतवणूकदारांना 12.02 टक्के परतावा दिला आहे. निफ्टीने वर्षभरात 12 हजार 287 अंशाची उच्चांकी, तर 10 हजार 583 अंशाची नीचांकी पातळी गाठली. निर्देशांकात 1305 अंशांची भर पडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stock market has given double-digit returns in the past year