UAN ला EPFO वेबसाईटवर कसं ऍक्टिवेट करायचं? माहित करून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 18 February 2021

यूनवर्सल अकाउंट नंबर (UAN) हा आपल्या व्यवहारासाठी खूपच उपयोग असतो

नवी दिल्ली: यूनवर्सल अकाउंट नंबर (UAN) हा आपल्या व्यवहारासाठी खूपच उपयोग असतो. तुमचा प्रॉव्हिडंट फंड, पैसे काढण्यासाठी आणि तसेच इतर सुविधांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर वापरला जातो. तुम्ही आतापर्यंत तुमचा पीएफ तपासला नसेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर ऍक्टीव्हेट करावा लागेल. तो नंबर कसा तपासायचा त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर कसा शोधायचा-
UAN नंबर हा तुमच्या बँकेच्या स्लीपवर लिहलेला असतो. जर हा नंबर तुमच्या पेमेंट स्लिपवर नसेल तर तुम्ही कंपनीच्या वित्त विभागाला संपर्क साधला पाहिजे.

निर्देशांकांची सलग दुसरी घसरण; येत्या काळात पाहायला मिळणार मोठी घसरण?

तुमचा UAN नंबर कसा ऍक्टिवेट करायचा?
जर तुम्ही आजपर्यंत पीएफ शिल्लक तपासणी केली नसेल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाइटला भेट द्या आणि तुमचा UAN नंबर ऍक्टीवेट करा.

1. सर्वप्रथम पीएफच्या वेबसाईटवर UAN नंबर ऍक्टिवेट करा.

2. UAN नंबर, कॅपचा टेक्स्ट, जन्म तारीख, मोबाईल नंबर टाकून Get Authorization pin वर क्लिक करा.

3. यानंतर मोबाईलवर otp येईल. 

या महिन्यात गॅस सिलिंडरवर किती सबसिडी मिळेल? घरबसल्या जाणून घ्या

4. त्यानंतर EPFO पेजवर सगळे डिटेल्स टाकून वेरीफाय करून I Agree वर click करा.

5. त्यानंतर otp टाकून Validate OTP वर क्लिक करून तुमचा UAN नंबर ऍक्टिवेट करा.

त्यानंतर तुम्ही 6 तासाने UAN नंबर आणि OTP टाकून पीएफ बॅलन्स चेक करू शकाल.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: importanat news How to activate UAN on EPFO ​​website