LPG Price Hike : वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका! गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

सरकारी तेल कंपन्यांनी 1 जानेवारी 2023 रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत.
LPG Price
LPG Priceesakal

LPG Price Hike : आजपासून नवीन वर्ष 2023 सुरू झाले आहे. नववर्षासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 1 जानेवारी 2023 रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत.

विशेष म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत करण्यात आली असून घरगुती गॅस सिलेंडर जुन्या दरात उपलब्ध आहेत. राजधानी दिल्लीत आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ :

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

अशा स्थितीत गृहिणींचे बजेट बिघडणार नसून, व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल मधील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. नवे दरही आजपासून लागू झाले आहेत.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

व्यावसायिक सिलेंडरचे दर-

  • दिल्ली - 1769 रुपये प्रति सिलेंडर

  • मुंबई - 1721 रुपये प्रति सिलेंडर

  • कोलकाता - 1870 रुपये प्रति सिलेंडर

  • चेन्नई - 1917 रुपये प्रति सिलेंडर

घरगुती गॅस सिलेंडरचे दर -

  • दिल्ली - 1053 रुपये प्रति सिलेंडर

  • मुंबई - 1052.5 रुपये प्रति सिलेंडर

  • कोलकाता - 1079 रुपये प्रति सिलेंडर

  • चेन्नई - 1068.5 रुपये प्रति सिलेंडर

LPG Price
UPI Down : न्यू इअर सेलिब्रेशनला 'ब्रेक'; गुगल पे, फोन पे वरून होईना पेमेंट

गेल्या वर्षी गॅस सिलेंडर 153.5 रुपयांनी महागला :

देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. शेवटचा बदल 6 जुलै 2022 रोजी करण्यात आला होता, जेंव्हा तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली होती. गेल्या एका वर्षाचा विचार केला तर घरगुती सिलेंडरच्या किंमतीत एकूण 153.5 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2022 मध्ये, घरगुती एलपीजीच्या किंमतीत चार वेळा बदल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com