मोदी सरकारचा बंपर धमाका; आता 'ही' मिळणार सूट

वृत्तसंस्था
Tuesday, 15 January 2019

नवी दिल्ली: येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून मध्यम वर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींकडून प्रत्यक्ष कराच्या रचनेत मोठे बदल होणार आहेत. येत्या अर्थसंकल्पात जेटली प्राप्तिकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्याची शक्यता असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. मध्यम वर्गीय नोकरदार वर्गाचे पाच लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता आहे. सध्या अडीच लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. तेच आता दुप्पट करण्याची घोषणा मोदी सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे. 

शिवाय शेतकरी आणि मजूर वर्गासाठी देखील नवीन योजनांची घोषणा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मजूर वर्गाला 'पीएफ'ची सुविधा देण्याबाबत विचार सुरु आहे. 

सध्याची कररचना 

उत्पन्न                                               कर 
2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न                    करमुक्त
 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत उप्तन्न         5 टक्के प्राप्तिकर 
5 ते 10 लाख उत्पन्न                        20 टक्के प्राप्तिकर 
10 लाखांहून अधिक उत्पन्न               30 टक्के प्राप्तिकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income Tax exemption limit may go up to Rs 5 lakh per year