Income Tax Refund : तुमचा आयकर रिफंड अद्याप जमा झाला नाहीये? मग या गोष्टी तपासून पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tax Refund

तुमचा आयकर रिफंड अद्याप जमा झाला नाहीये? मग या गोष्टी तपासून पाहा

Income Tax Refund : जर तुम्ही देखील करदाते (Tax Payer) असाल आणि तुमच्या खात्यात रिफंड आला नसेल तर यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. इन्कम टॅक्स इंडियाने ट्विट करत माहिती दिली आहे की, CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 17 जानेवारी 2022 पर्यंत 1.74 कोटी करदात्यांना 1,59,192 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. मात्र चार-पाच महिन्यांपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरूनही रिफंड न मिळाल्याने, रिफंड मिळाले नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर अजूनही अनेक जण करत आहेत. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुम्ही काय काळजी घ्यावी, हे माहित असले पाहिजे. तेच आज आपण जाणून घेणार आहोत..

आयकर विभाग आता फक्त बँक खात्यात टॅक्स रिफंड पाठवतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या खात्याचा चुकीची माहिती भरली असेल, तर तुमचा रिफंड अडकून राहू शकतो. तुम्ही आयकर विभागामार्फत ही माहिती दुरुस्त करू शकता. तुम्ही तुमच्या फॉर्ममधील अकाउंट डिटेल्स ऑनलाइन दुरुस्त करू शकता. यासोबतच, तुम्ही तुमच्या रिटर्न फॉर्ममध्ये ज्या बँक खात्याचा डिटेल्स देत आहात ते देखील पॅनशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

अकाउंट व्हेरिफाय करा

वेळेवर रिफंड न मिळण्याचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे बँक खाते Pre verified न केलेले असणे. आयकर विभागाकडून ज्या बँक खात्यात टॅक्स रिफंड मिळणार आहे, जर करदात्याने त्याची आधी व्हेरिफिकेशन केलेले नसेल, रिफंड आडकतो. त्यामुळे करदात्याने आयकर विभागाशी संबंधित बँक खाते वेळेवर व्हेरिफाय करावे. तुमचा जो काही रिफंड जनरेट होईल, तो सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर च्या माध्यमातून या खात्यात पोहोचेल.

वेळेवर व्हेरिफिकेशन करा

आयकर रिटर्न भरल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन करावे लागते. अनेक वेळा असे घडते की करदाते त्यांचे आयकर रिटर्न वेळेवर भरतात पण ते त्याची व्हेरिफिकेशन करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमचा रिटर्न लवकर मिळवायचा असेल तर त्याचे व्हेरिफिकेशन करायला विसरू नका. जर तुमचा रिफंड मिळाला नसेल तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवरून स्टेटस तपासू शकता. तुम्ही तुमचा पॅन आणि लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून हे काम करू शकता.

हेही वाचा: Flipkart ग्रँड सेल; लॅपटॉप, टॅबसह अ‍ॅक्सेसरीजवर मिळतेय 80% पर्यंत सूट

रिफंड म्हणजे काय असतो?

करदात्याचा आयकर त्याच्या अंदाजित गुंतवणूक डॉक्यूमेंट्सच्या आधारे व्यावसायिक वर्षाच्या सुरुवातीलाच कापला जातो. तसेच जेव्हा तो आर्थिक वर्षांच्या (Financial years) अखेरीस सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करतो. नंतर हिशोब केल्यास त्या करदात्याकडून कर अधिक कापला गेला आहे असे आढळून आले तर त्यासाठी तो आयटीआर दाखल करून रिफंड मिळवण्यासाठी अर्ज करतो.

हेही वाचा: Jio चा स्वस्त प्लॅन, डेली 2GB डेटासोबत 1 वर्ष फ्री Disney + Hotstar

तुम्हालाही अद्याप परतावा मिळाला नसेल, तर सर्वप्रथम रजिस्टर्ड ईमेल तपासा. कोणत्याही विसंगतीमुळे रिफंड रोखल्यास, आयकर विभागाकडून ईमेल पाठवला जातो. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून देखील ते तपासले जाऊ शकते. काही त्रुटी आढळल्यास, दुरुस्त करा.

तक्रार कशी नोंदवणार?

कोणताही चूक न होऊनही रिफंड आला नसेल, तर त्याची तक्रार आयकर विभागाकडे करता येईल. आयकर विभागाने यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. करदाते आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलद्वारे देखील तक्रारी नोंदवू शकतात. lत्यासाठी..

  1. सर्वप्रथम आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

  2. तुमचे नाव, पॅन कार्ड क्रमांक आणि असेसमेंट वर्षाची माहिती एंटर करा.

  3. तुमची तक्रार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा.

  4. तुम्ही संपर्कासाठी तुमचा कोणताही सोशल मीडिया आयडी देऊ शकता.

  5. यानंतर तुम्हाला कॅप्चा एंटर करण्यास सांगितले जाईल.

  6. आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करताच तुमची तक्रार नोंदवली जाईल.

हेही वाचा: कोरोना कमकुवत होतोय?; सलग दुसऱ्या आठवड्यात घसरली 'आर व्हॅल्यू'

Web Title: Income Tax Refund Has Not Been Transferred In Account Know How To File A Complaint And Some Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Income Tax Return