Flipkart ग्रँड सेल; लॅपटॉप, टॅबसह अ‍ॅक्सेसरीजवर मिळतेय 80% पर्यंत सूट | Flipkart The Grand Gadget Days | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FlipKart

Flipkart ग्रँड सेल; लॅपटॉप, टॅबसह अ‍ॅक्सेसरीजवर मिळतेय 80% पर्यंत सूट

Flipkart Grand Gadget Days Sale 2022 : जर तुमचा लॅपटॉप, टॅब्लेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर कदाचित ही तुमच्यासाठी फरफेक्ट वेळ आहे. कारण फ्लिपकार्टवर अनेक डिव्हाइसवर सध्या बंपर डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. सध्या, Flipkart The Grand Gadget Days सेल सुरु असून हा चार दिवसांचा सेल आजपासून सुरू झाला आहे आणि तो २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्के पर्यंत सूट मिळत आहे.

सेल दरम्यान, ग्राहक लॅपटॉप, हेडफोन, मॉनिटर्स, कॅमेरा, हेल्थकेअर उपकरणे, स्मार्टवॉच आणि पॉवर बँक्सवर डील्स आणि डिस्काउंट घेऊ शकतात. काल संपलेल्या फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग्स डे सेलमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि गृहोपयोगी वस्तूंवरील ऑफर देण्यात आल्या होत्या. आता फ्लिपकार्ट आणखी एक सेल आयोजित करत आहे, परंतु यावेळी मागील सेलचा भाग नसलेल्या उत्पादनांवर चांगल्या ऑफर देण्यात येत आहेत. वाचा सविस्तर यादी

लॅपटॉप्स

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये लॅपटॉपवर 30 टक्के सूट देत आहे. ऑफर केवळ डेल लॅपटॉपसाठी लिस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये Dell Inspiron Ryzen 5, Dell Inspiron Vostro Core i3 11th-gen, Inspiron Core i3 11th-gen मॉडेल्सचा समावेश आहे.

मॉनिटरवर डिस्काउंट

सेलमध्ये रेग्युलर आणि गेमिंग मॉनिटरवर डिस्काउंट मिळत आहे यामध्ये HP, MSI, LG, Dell, Acer, Lenovo यासह काही लोकप्रिय ब्रँडवर ऑफर उपलब्ध आहेत.

टॅबलेट्स

ग्रँड गॅझेट डेज सेल दरम्यान, संभाव्य खरेदीदार टॅब्लेटचे प्रीमियम ब्रँड्स- Apple, Samsung यांच्याकडून डील मिळू शकतात. काही निवडक Apple आणि सॅमसंग टॅबलेट्स 30,999 रुपयांपासून उपलब्ध असतील.

हेही वाचा: फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

ऑडिओ प्रॉडक्ट्स

ही ऑफर ऑडिओ उत्पादनांवर देखील लीस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये Jabra आणि Bose च्या निवडक ब्लूटूथ हेडफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट. TWS इअरबड्स, साउंडबार, होम थिएटर, ब्लूटूथ स्पीकर अनुक्रमे 30 टक्के, 40 टक्के, 60 टक्के आणि 40 टक्के सूट मिळत आहेत. गुगल, Mi इ. चे निवडक स्मार्ट स्पीकर 2,799 रुपयांपासून सेलमध्ये उपलब्ध असतील.

कॅमेरे आणि इतर मोबाइल अ‍ॅक्सेसरीज

Flipkart DSLR आणि स्मार्टवॉचवर देखील अनेक ऑफर करत आहे. DSLR आणि मिररलेस कॅमेऱ्यांवर 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर सूचीबद्ध आहे. फिटनेस बँड आणि स्मार्टवॉच 1,999 रुपयांच्या कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. पॉवर बँका Rs.699 पासून उपलब्ध आहेत. शेवटी, मोबाईल केस आणि कव्हर फक्त रु.99 पासून उपलब्ध होतील.

हेही वाचा: Airtel चे ३ परवडणारे प्रीपेड प्लॅन; मिळते चांगली व्हॅलिडिटी अन् डेटा

Web Title: Flipkart Grand Gadget Days Sale Is Live Get Upto 80 Percent Discount On All Gadgets Accessories

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :flipkart