
- सलग तिसऱ्यांदा मुदतीत वाढ
- केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मिळणार दिलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2018-19 साठीचा आयकर रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या मुदतीत आणखी दोन महिन्यांनी वाढ केली आहे. या नव्या मुदतीनुसार आयटी रिटर्न 30 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीवर नजर टाकत आयकर विभागाने कर भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'सेंट्रल बोर्ड डायरेक्ट टॅक्स' (CBDT) विभागाने आर्थिक वर्ष 2018-19 साठी अंतिम तारीख 31 जुलै, 2020 दिली होती. मात्र, आता यामध्ये वाढ करण्यात आली असून, 30 सप्टेंबर, 2020 करण्यात आली आहे. 2018-19 या वर्षासाठी रिटर्न भरण्याची तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सलग तिसऱ्यांदा मुदतीत वाढ
आर्थिक वर्ष 2018-19 साठी रिटर्न भरण्याची मुदत 31 मार्च, 2020 होती. मात्र, त्यामध्ये वाढ करण्यात आली. त्यानुसार नवी मुदत 31 जुलै, 2020 केली होती. पण या मुदतीतही वाढ करण्यात आली असून, आता 30 सप्टेंबर, 2020 नवी मुदत करण्यात आली आहे.
In view of the constraints due to the Covid pandemic & to further ease compliances for taxpayers, CBDT extends the due dt for filing of Income Tax Returns for FY 2018-19(AY 2019-20) from 31st July, 2020 to 30th September, 2020,vide Notification in S.O. 2512(E) dt 29th July, 2020. pic.twitter.com/Wlzvf8S83x
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 29, 2020
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मिळणार दिलासा
देशात सध्या कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हजारो करदात्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.